जमीनीचे वादातुन नातेवाईकांवर गावठी पिस्तुलातुन फायर आरोपी शेवटी ८ तासात हिंजवडी पोलीस गुन्हे शाखेच्या ताब्यात…

प्रतिनिधी-रणजित मस्के
पुणे : हिंजवडी पोलीस ठाणे,पिंपरी चिंचवड यानी दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी दिलेल्या माहितीनुसार
जमीनीचे वादातून नातेवाईकावर गावठी पिस्तुलाने फायर करून जीवघेणा हल्ला करणाऱ्या ४ आरोपींना ८ तासात अटक, तपासात त्यांनी मालाविरूध्दचे १६ गुन्हे केल्याचे निष्पन्न करून चोरीचा ८,१७,000/- रू किंचा माल हस्तगत हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगीरी.

दि. २०/१०/२०२२ रोजी फिर्यादी नामे येशू लूटेरा मारवाडी वय २८ वर्षे, रा.ब्लू डार्ट कंपनीचे जवळ, शिव कॉलनी, नेरे दत्तवाडी, ता.मुळशी, जि.पुणे यांचा चुलत पुतण्या नामे विकी रजपुत याने वाकड येथील जागेच्या वादातुन फिर्यादी राहत असलेल्या घरी विकी रजपुत व त्याचे साथीदार यांचे सह येवुन फिर्यादी व त्यांचे चुलते नागु मारवाडी, चुलत भाऊ नितीन मारवाडी व वडील लुटेरा मारवाडी यांना शिवीगाळ केली, तसेच विकी रजपुत याने फिर्यादी यांस जिवे ठार मारण्याचे उददेशाने त्याचे कडील गावठी पिस्तुलाने गोळया झाडल्या असता ती फिर्यादीचे हाताला घासुन जावुन तो जखम झाला, ते स्वतःला वाचवण्यासाठी पळुन घरात जाउन लपले म्हणून विकी राजपुत याचे सोबत असलेल्या राजु ठाकुर, पृथ्वीराज राठोड, शित्रुन रजपूत यांनी फिर्यादीचे चुलते, चुलत भाऊ व वडीलांवर गिलोरीने दगडे मारली तसेच विकी रजपुत याने जिवे ठार मारण्याचे उददेशाने पुन्हा पत्र्याचे शेड मध्ये गोळी झाडली म्हणुन वरील लोकांविरुध्द हिंजवडी पोलीस ठाणे ९९६/२०२२ भा.द.वि.कलम ३०७, ५०४, ५०६, ३४ सह आर्म अॅक्ट ३/२५ सह मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हा घडल्याची माहीती मिळताच, सदरची माहीती मा. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिं चिं यांना कळऊन त्यांचे मार्गदर्शना नुसार सदर गुन्ह्याचा तात्काळ तपास चालु करून तपास पथकातील अंमलदार यांची दोन पथके तयार करून आरोपीतांचे शोध कामी रवाना करून, तपासादरम्यान घटनास्थळावर मिळून आलेले दोन रिकाम्या पुंगळया व एक जीवंत काडतुस घटनास्थळावरून जप्त करण्यात आले. तसेच नेमलेल्या शोध पथकाने आरोपीतांचा माग काढण्यासाठी घटनास्थळाचे आजुबाजुचे तसेच आरोपी मिळून येणारे संभाव्य ठिकाणचे एकूण १५ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत असतानाच सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीचे आधारे यातील आरोपीतांना कस्तुरे चौक, विठ्ठल लॉन्स चे समोर ट्रॅप लावुन चार आरोपी हे दोन दुचाकी गाडीवरून पळुन जात असताना त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन गुन्हा घडल्यापासून ८ तासाचे आतच दि. २०/१०/२०२२ रोजी २३:५५ वा. अटक केली.
त्यांची नावे
१) विक्की ऊर्फ विकास मुरली रजपुत वय-२४ रा. वेणुनगर गणेशमंदीरासमोर वाकड पुणे
२) पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड वय-२० रा. मु.पो. भोसे ता. खेड जि. पुणे
३) ज्ञानेश्वर ऊर्फ काळया ऊर्फ शित्रुन गब्बर राजपुत वय-२० रा. बुध्द विहार मंदीरासमोर वाडी बोलाई ता. हवेली जि. पुणे
४) राजु अक्षय ठाकुर वय-२० रा. आकुर्डी स्टेशनजवळ सप्तशृंगी कॉलनी नंद डेअरीजवळ पुणे.
तपासात अटक आरोपी अक्र १ विक्की ऊर्फ विकास मुरली रजपुत याच्याकडून फायर केलेले गावठी पिस्टल व जिवंत चार काडतुस जप्त केले आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांचेकडे कौशल्याने केलेल्या तपासादरम्यान समजले की, दि.२५/०९/२०२२ रोजी रात्री ०७/३० वा च्या सुमारास सोने व्यापारी श्रीकांत तुकाराम कदम रा मलवडी ता माण हे मलवडी ता.माण जि.सातारा हे दुकानातील सोन्या चांदीचे दागीणे घेऊन दुचाकी गाडीवरून जात असताना त्यांना यातील
अटक आरोपी क्र २) पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड ३) ज्ञानेश्वर ऊर्फ काळया ऊर्फ शित्रुन गब्बर राजपुत ४) राजु अक्षय ठाकुर व त्यांच्या इतर दोन साथीदारांनी आडवून गावठी पिस्टल ने फायर करून व तलवारीने मारहाण करून त्यांच्या कब्जातील ४० तोळे सोन्याचे दागीने व ३० किलो चांदीचे दागीने घेऊन पळून गेल्या बाबत त्यांच्या विरूध्द दहिवडी पोलीस स्टेशन सातारा गुरनं २२४/२०२२, भादवि कलम ३९५,३९७,३०७, आर्म अॅक्ट कलम ३(२५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे, सदर गुन्हा केल्यापासून आरोपी फरार होते ते पोलीसांना मिळून येत नव्हते. त्यांना विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांच्याकडून दहिवडी पोलीस स्टेशन येथे सोने व्यापा-यावर टाकलेल्या दरोडयाच्या गुन्हयातील ९ तोळे २ ग्राम चे दागिने जप्त केले आहेत. तसेच वर नमूद आरोपी यांनी हिंजवडी, निगडी, पौड पोलीस ठाणेचे हद्दीत चोरी, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे केले असून असे एकूण १६ गुन्हे केल्याचे निष्पन्न करून त्यातील चोरीस गेलेला एकूण ८,१७,०००/- रू किं चा माल हस्तगत करून हिंजवडी तपास पथकाने उल्लेखनिय कामगीरी केली आहे.
दाखल गुन्हे व हस्तगत मालाची माहीती खालीलप्रमाणे –
अ.क्र पो. स्टे. गुन्हा रजि नं
जप्तमाल हिंजवडी | ९९६/२०२२
१) ४०,०००/- रु. कि. एक काळे रंगाची होंडा शाईन मोटरसायकल भादवि ३०७
क्रमांक एम.एच १४ जे.टी २९४८
२) ३००००/- रु किमतीचा एक लोखंडी धातुचे पिस्टल,
३) २०००/- रु कि.चे ४ जिवंत राऊंड त्यावर KF 7.65 असे
४) ३००/- रु कि.चे ३ गलोर | २ | हिंजवडी ३०६/२०२२ भा.द. ५)२५,०००/- रु. कि. एक चांदीचा गणपती व १० चांदीचे लहान देव १
वि.क. ३८०,४५७, ३४।। | तांब्याचा देव एकुण १०५ ग्रॅम | हिंजवडी | ४९९/२०२२ भा.द. |
६ )३५००/- रु कि.चे ६२.९०० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैजन जुवाकिअ.
वि.क.३८०, ४५४, ४५७ हिंजवडी ८५५/२०२२ भा.द. वि.
७) ३९००/- रु.कि.चे एक ग्रॅम सोन्याचा मुलामा दिलेले बाजुबंद जुवाकिअ.
क. ३८०, ४५४, ४५७ । | हिंजवडी | १५/२०२२ भा.द. वि.क.
८) १०००/- रु.कि.चे २२.६० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैजन जुवाकिअ.
४५७, ३८० | हिंजवडी | ५६०/२०२२ भा.द.
९) ३८०००/- रु.कि.ची ४.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोकोनी नक्षी
वि.क. ४५७, ३८० असलेली व ३.५ ग्रॅम वजनाची सोन्याची लेडीज अंगठी जुवाकिअ. | हिंजवडी ३७०/२०२२ भा.द.वि.
१०)१०,०००/- रु.किची. १.५४ ग्रॅम वजनाच्या नाकातील मोर्डी व कानातील
क. ३८०, ४५४ सोन्याच्या रिंगा जुवाकिअ. | हिंजवडी | ७९९/२०२२ भा.द.वि. ६६१/- रु त्यात १ रुपयाचे १९२ कॉईन, २ रुपयाचे १७७ कॉईन, ५ क. ४५७,३८०,४२७, रुपयांचे १५ कॉईन, १० रुपयांचे ४ कॉईन एकुण ६६१ रुपये
हिंजवडी | ९०३/२०२२
भा.द.वि.कलम ३८० हिंजवडी १०२६/२०२२
भा.द.वि. ३७९
५५०००/- रु.कि.चा एक आयफोन -११ प्रो. सिल्वर रंगाचा त्याचा IME| | NO- 352835112100295/352835112164150
१०,०००/- रु किमतीची एक अॅक्टीवा मो.सा.क्रमांक MH-26,AU-6375 तिचा चेसिस क्रमांक ME4JC4475C8137585 इंजिन क्रमांक JC44E2248746 असा असलेली
१) ५०,०००/- रु. कि. चा एक सोन्याचा नेकलेस १०.१९० ग्रॅम वजनाचे
२)२५०,०००/- रु. कि. चा एक सोन्याचा नेकलेस १०.१७० ग्रॅम वजनाचे
३) २५,०००/- रु. कि. चे एक सोन्याची अंगठी ५.५० ग्रॅम वजनाची
४)१८,०००/- रु. कि. चे एक सोन्याची अंगठी ३.६४० ग्रॅम वजनाची
५) १३,०००/- रु. कि. चे एक सोन्याची अंगठी २.९०० ग्रॅम वजनाची
६) ९०,०००/- रु. कि. चे एक सोन्याचे गंठन काळे मणी असलेले १८.७६० ग्रॅम वजनाचे
७) ३५,०००/- रु. कि. चे एक सोन्याचे गंठन चैन असलेले ६.८०० ग्रॅम वजनाचे
८) ५५,०००/- रु. कि. चे एक सोन्याचे गंठन काळे मणी असलेले तीन तुकडयांमध्ये १०.८४० ग्रॅम वजनाचे
९)१७०००/- रु. कि. एक कानातील चैन जोडी ३.७७० ग्रॅम वजनाचे
१०) १८०००/- रु. कि. एक कानातील चैन जोडी ३.७०० ग्रॅम वजनाचे
११) १८००० /- रु. कि. एक कानातील चैन जोडी ३.८५० ग्रॅम वजनाचे
१२) २०,००० /- रु. कि. एक कानातील चैन जोडी ४.११० ग्रॅम वजनाचे
१३) २५०००/- रू.कि.ची एक सोन्या ची चैन ५.१२० ग्रॅम वजनाची
१४) १७०००/- रु.ची एक सोन्याची चैन ३.४३० ग्रॅम वजनाची
सदरची कारवाई मा. श्री. अंकुश शिंदे साो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ संजय शिंदे सो, अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. आनंद भोईटे, पोलीस उप आयुक्त परि. २, पिंपरी चिंचवड मा. श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग वाकड, यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोउनि, रमेश पवार, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडीत यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com