अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या बिर्यानीवाल्याला शिवाजीनगर पोलीसांनी ठोकल्या बेडया

ठाणे :अंबरनाथ( पूर्व )भागातील शिवाजीनगर परिसरात हाजी अली कॅटरर्स नावाचं बिर्याणीचं दुकान आहे. या दुकानात एक 16 वर्षांचा मुलगा काम करतो. हा मुलगा 4 दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी दुकानात झोपलेला होता. त्यावेळी दुकान मालक उमर खान याने दुकानात येऊन त्याच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक अत्याचार केला.

इतकेच नाहीतर पीडित मुलाचं डोकं भिंतीवर आपटत त्याला मारहाण केली.यानंतर पीडित मुलाने आपल्या गावी असलेल्या आईला फोन वरून याची माहिती दिली. त्यावरून मुलाच्या आईने मालक उमर खान याला या प्रकाराचा जाब विचारला असता, त्याला राग आला. त्यामुळे त्याने पीडित मुलाचं डोकं भिंतीवर आपटत त्याला जबर मारहाण केली.
या मारहाणीत पीडित अल्पवयीन मुलाचे दोन दातही पडले. दुसऱ्या दिवशी बिर्याणीच्या दुकानात आलेल्या एका ग्राहकाने पीडित मुलाला तुझा चेहरा का सुजला आहे?
अशी विचारणा केली असता त्या मुलाने त्याला आपल्यासोबत घडलेला संपुर्ण प्रकार सांगितल्यानंतर या ग्राहकाने शिवाजीनगर पोलिसांना या बाबतची माहिती दिली असता शिवाजीनगर पोलिसांनी पॉस्को कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपी उमर खान याला तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 20 नोव्हेंबर 2021 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com