येरवडा कारागृहात जन्मठेपाचे शिक्षा भोगणारा फरार आरोपी अनिल पटेनियाला उल्हासनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
उल्हासनगर ठाणे

दिनांक १८ जुलै २०२५ रोजी
उल्हासनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने येरवडा जेल मध्ये न्यायबंदी फरार आरोपी अनिल मेघदास पटेनिया, वय २८ वर्षे यास सापळा रचुन रंगेहाथ पकडुन त्याचे कब्जातुन उल्हासनगर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. १६९१/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३ (२) या गुन्हयातील चोरीस गेलेली अॅक्टीवा मोटार सायकल क्र. MH-05/BZ-2294 ही हस्तगत केली.
उल्हासनगर पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा रजि. क्र. १६९१/२०२५ भा. न्या.सं.क. ३०३ (२) प्रमाणे दिनांक १६/०७/२०२५ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला. नमूद गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने वरिष्ठ अधिकारी यांचे आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.उप-निरी. / नवले, पो.हवा./२४९३ भोजणे, पो. हवा./६५६२ कांबळे, पो.हवा./६५७१ पाटील, पो.हवा./६४३७ पाडेकर, पो. हवा./३३७७ सिध्दार्थ गायकवाड, पो.कॉ. / ८२७६ सोनवणे, पो.कॉ./८२२६ शेकडे, पो.कॉ. /२३०२ तडवी असे पथक नेमण्यात आले.सदर गुन्हयाचे प्राथमिक तपासा दरम्यान तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने एक इसम हा नमुद गुन्हयातील चोरीस गेलेली अॅक्टीवा मोटार सायकल क्र. MH-05/BZ-2294 ही घेवुन दुर्गामाता नगर, खेमानी, उल्हासनगर १ या परीसरात फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने मिळालेल्या बातमीची खात्री केली असून नमुद संशयीत इसमास पळुन जाण्याचा वाव न देता जागीच ताब्यात घेवुन पोलीस ठाणे येथे आणले. नमुद संशयीत इसमाकडे त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अनिल मेघदास पटेनिया, वय २८ वर्षे, राह. डिम्पल हॉस्पिटलसमोरील गल्लीत, म्हारळ गाव, ता. कल्याण जि. ठाणे असे असल्याने सांगुन त्याने नमुद मोटार सायकल ही चोरी केली असल्याची कबुली दिली. तसेच त्याचेकडे आणखीन विचारपुस करता तो टिटवाळा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 1 १४७/२०१६ भा.दं.वि.क. ३०२ व इतर मध्ये येरवडा कारागृह, पुणे येथे जन्मठेपेचे शिक्षेत न्यायबंदी असता ओपन जेलमधुन पळुन आला असल्याचे त्याने कळविले. त्याबाबत येरवडा पोलीस स्टेशन, पुणे येथे संपर्क साधुन खात्री केली असता सदर प्रकाराबाबत येरवडा पोलीस स्टेशन, पुणे येथे गुन्हा रजि. नं. १८३३/२०२४ भा.न्या.सं. क. २६२ प्रमाणे दिनांक ११/१२/२०२४ रोजी गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली. नमुद आरोपी उल्हासनगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा रजि. नं. १६९१/२०२५ भा. न्या.सं.क. ३०३ (२) या गुन्हयात दिनांक १७/०७/२०२५ रोजी ००.५५ वा. अटक करण्यात आली असुन त्यास मुदतीत न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, २ रे न्यायालय, उल्हासनगर यांचे न्यायालयात हजर केले असता त्यास दिनांक १८/०७/२०२५ रोजी पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आली.सदर कारवाई पोलीस आयुक्त साो., ठाणे शहर, सह पोलीस आयुक्त ठाणे शहर, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, कल्याण संजय जाधव, पोलीस उप आयुक्त, परि ४, उल्हासनगर सचिन गोरे, सहायक पोलीस आयुक्त, उल्हासनगर अमोल कोळी यांचे मार्गदर्शनाखाली विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हासनगर पोलीस ठाणे, अंकुश म्हस्के, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उप निरीक्षक पी. के. नवले, पो.हवा./२४९३ सुजित भोजणे, पो.हवा./६५६२ प्रमोद कांबळे, पो. हवा./६५७१ भगवान पाटील, पो. हवा. /६४३७ विलास पाडेकर, पो. हवा./३३७७ सिध्दार्थ गायकवाड, पो. कॉ. / ८२७६ संदिप सोनवणे, पो.कॉ./८२२६ संदिप शेकडे, पो.कॉ./२३०२ राजू तडवी यांनी केली आहे.