येरवडा पोलीसांनीबेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणा-या सराईत आरोपीला केले जेबंद

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

पुणे

वरिष्ठाचे आदेशान्वये येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगुन गुन्हे करणा-या लोकांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे अधिकारी व स्टाफ असे पेट्रोलींग करत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व विशाल निलख यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गुंजन चौक परीसरात, येरवडा याठिकाणी एक इसम पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक प्रदिप सुर्वे, व पोलीस स्टाफ यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन संशयित इसमावर पाळत ठेऊन संशयित इसम पळून जाण्याचे तयारीत असताना त्यास शिताफीने ताब्यात घेतले असता त्याचेकडे १ पिस्टल व २ जिवंत राऊंड मिळुन आले.

त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने सोप्या सरकार उर्फ सोपान रामेश्वर सावंत, वय २३ वर्षे रा. गांधन खिळा वस्ती, फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे असे असल्याचे सांगितले. सदरबाबत दि.२२/०६/२०२५ रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४१९/२०२५ भारतीय हत्यार कायदा ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपी कडुन एकुण ३००००/- रु. कि.चे ०१ पिस्टल व १०००/- रु. किं. चे २ जिवंत राऊंड असा एकुण ३१०००/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०४, पुणे शहर श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन, श्री. रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विजय ठाकर, तपास पथकाचे सपोनि रविकांत नंदनवार, श्रेणी पोउनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार शिंदे, गवळी, गायकवाड, निलख, वाबळे, जायभाय, सोगे, कांबळे, सुतार यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट