यवतमाळ पोलीसांनी शहरातील वाहण चोराला ठोकल्या बेड्या..

उपसंपादक- रणजित मस्के
यवतमाळ:– यवतमाळ शहरामधे मोटर सायकल चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेवुन मा. पोलीस अधिक्षक सा, यांनी सदर वाहन चोरी करणा-या टोळयांवर प्रभावी कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले होते त्यानुसर मा. अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ श्री जगताप साहेब, व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, यवतमाळ श्री भौसाने साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्री नरेश रणधिर, ठाणेदार अवधुतवाडी व गुन्हे प्रकटीकरण पथकाने खालीलप्रमाणे कारवाई केली आहे.
दिनांक १०/०५/२०२४ रोजी रात्री १०/०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन अवधुतवाडी डि. बी. पथकास माहीती मिळाली की, बस स्टैंड येथे एक ईसम हा चोरीची मोटर सायकल विक्री करीता घेवुन येत आहे अशा मिळालेल्या माहीतीवरून डि. बी. पथक हे एसटि स्टैंड येथे गेले असता तेथे एक ईसम मोटर सायकलसह मिळून आला. त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अमोल शाम देहाने, वय २६ वर्ष, रा. शिंदे महाराज मठ, लोहारा असे सांगीतले. त्याचे जवळ असलेल्या मोटर सायकल चे कागदपत्रांची मागणी केली असता त्याचेकडे कोणतेही कागदपत्र नसल्याने व उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्या मोटर सायकल सह पोलीस स्टेशन अवधुतवाडी येथे आणले व सखोल विचारपुस केली असता त्याने एकुण ०६ मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली व त्याने पोलीस स्टेशन अवधुतवाडी येथील ०३ गुन्हयातील मोटर सायकल तसेच यवतमाळ शहर येथील ०१, वर्धा येथेल ०१ व अन्य ०१ असे चोरी केलंल्या मो सा यातील आरोपी कडुन जप्त करण्यात आल्या असुन त्याचे अपराध क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
अवधूतवाडी पोलीस स्टेशन
यवतमाळ पोलीस स्टेशन
०१) १२८९/२०२२ कलम ३७९ भा. द. वि. (पोलीस स्टेशन अवधुतवाडी)
०२) ४७१/२०२४ कलम ३७९ भा. द. वि.
०३) ५६३/२०२४ कलम ३७९ भा. द. वि.
०४) ४८८/२०२४ कलम ३७९ भा. द. वि.
०५) वर्धा येथे चोरलेली फॉशन प्रो होंडा एम एव ३२ एडी ०६५०
०६) एम एच ४९ टि ७०१९ मायस्ट्रो हिरो कंपनीची हिचा शोध चालु असुन
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक यवतमाळ डॉ. पवन बनसोड साहेब, अपर पोलीस अधिक्षक श्री. पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनेश भैसाने साहेब यांचे मार्गदर्शनात ठाणेदार नरेश रणधीर,, सपोनि रामकृष्ण भाकडे, सपोनि रोहीत चौधरी, सफौ. १६८१ वाटमोडे, पो. हवा. ११ विशाल भगत पो. हवा.३९० रवी खांदेव, पो हवा बलराम शुक्ला ब नं १५९९, पो हवा. २२०७ प्रशांत गेडाम, नापोशि रूपेश ढोबळे, ब. नं. १३९२, पो. शि. कमलेश भोयर ब. नं. २४९३, पो. शि. सागर चिरडे, ब. नं. २०५६, पो. शि. रशीख शेख ब. नं. ११३८, ईत्यादिनी केली….
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com