यंदाचा कोकण रत्न पुरस्कार- २०२४ सुप्रसिद्ध व जेष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांना जाहीर !…

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगांव रायगड :- माणगांव :-रायगड सांस्कृतिक कला मंडळ, महाराष्ट्र राज्य रजि. या सांस्कृतिक नातं जपणार व्यासपीठ या संस्थे मार्फत अतिशय मानाचा व पहिला कोकणरत्न पुरस्कार 2024* पुरस्कार जेष्ठ व सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांना सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी सांय 4.00 वाजता अशोकदादा साबळे विद्यालय, माणगांव येथे कोकणचे भाग्यविधाते मा.खासदार श्री.सूनिलजी तटकरे साहेब, आमदार मा.श्री.भरतशेठ गोगावले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष- मा.श्री. मेघराज राजे भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते व मा.श्री.अँड.राजीवजी साबळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अशोकदादा साबळे विद्यालय, माणगांव येथे संपन्न होणार आहे.सचिन पिळगांवकर सरांच्या चित्रपटसृष्टीतील 62 वर्षांच्या कार्याचा आढावा घेतल्यास त्यांच्या बालवयातील पाचव्या वर्षा पासूनच म्हणजेच १९६३ साली पासून आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. आपल्या अलौकिक प्रतिभेने आपण मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करुन देशातच नव्हे तर जगभरातील सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आपल्या अष्टपैलु विनोदी, भावनिक, सामाजिक संस्कारक्षम विविधरंगी भूमिकांमधून आपण प्रेक्षकांच्या मनात विशेष असे स्थान मिळवले आहे.
त्यांच्या चित्रपटातील प्रदिर्घ यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेतल्यास, ‘हा माझा मार्ग एकला’ (१९६३) या मराठी चित्रपटातुन सिनेसृष्टीत आपल्या लहानपणा पासूनच सुरुवात करून, प्रौढ भूमिकां कडे वळण्यापूर्वी गीत गाता चल (सन-१९७५) सारख्या अत्यंत यशस्वी रोमॅण्टिक चित्रपटांचा भाग बनण्या पूर्वी बाल कलाकार म्हणून सुमारे ६५ चित्रपटांमध्ये लक्षणीय काम केले आहे. बालिका वधू (१९७६), आँखियों के झरोखों से (१९७८) आणि नदिया के पार (१९८२), मुख्य अभिनेता म्हणून आपण भारतातील प्रत्येक घराघरात सुपरिचित झाले आहात.

विशेष म्हणजे हिंदी, मराठी तसेच कन्नड भोजपुरी सिनेमांमध्ये देखील आपल्या खास अभिनयाचा ठसा उमटवत काम केले आहे. यानंतर बदलत्या काळानुरुप तू तू मैं मैं ( सन २००० ) तसेच कडवी खट्टी मेथी यासह भारतीय टेलिव्हिजन(दूरदर्शन) वरील यशस्वी कॉमेडी शोमध्ये चमकदार अभिनयासह निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केले आहे . मै बाप (१९८२), नवरी मिळे नवऱ्याला (१९८४) पासून सुरू होणारे अनेक हिट गाजलेल्या मराठी चित्रपटांतील दिग्दर्शनही बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक हिट ठरले. अशी ही बनवा बनवी (१९८८) आणि आमच्या सारखे आम्हीच (१९९०) बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. नवरा माझा नवसाचा (२००४) देखील सुपर-डुपर हिट ठरला. आणि २००७ मध्ये आपण कन्नड सिने-सृष्टीतील ‘एकदंथा’ या चित्रपटातून पदार्पण केले तेच मुळी कन्नड स्टार विष्णुवर्धन सोबत, नवरा माझा नवसाचा हा याच चित्रपटाचा रिमेक होता.

सध्या नुकताच २० सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणारा व संपुर्ण महाराष्ट्राभर चर्चित असलेला ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट देखील आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे… अनेक चित्रपटांमध्ये आपल्या बहुरूपी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून, पोटधरुन हसवले तसेच काही चित्रपटातील आपल्या अभिनयाने भावनिक साद घालीत रडवले देखील आहे. आपल्या विविध कला आणि संवेदनशील गुणांमुळे आपणांस सुसंस्कृत अनोखा अभिनेता म्हणून विशेष ओळखले जाते.

त्यांच्या लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि गायनाच्या क्षेत्रातील अपार मेहनतीच्या जोरावर आपण सतत केलेल्या नाविन्यपूर्ण कलात्मक कार्याने देखील चित्रपटसृष्टीत नवे मापदंड स्थापित करुन एका खास यशस्वी वळणावर आणले आहे. आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येका सोबत अनेक चढ-उतार वादळी तसेच संघर्षमयी जीवनात देखील आपण नेहमी सकारात्मक उभे राहत नव्या पिढीसमोर एक वेगळा आदर्श आहात याची आम्हांला मनापासुन जाणीव आहे. आपल्या सहवासाने व मार्गदर्शनाने चित्रपटसृष्टीतील अनेक नवोदितांना प्रेरणा मिळाली आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनय, कलेची समर्पणता, समाजसेवा, व मनमिळाऊ स्वभाव यांमुळे आपण मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अमिट छाप उमटवली आहे. आपल्या या अनमोल योगदानाची नोंद घेऊनच स्वप्न नगरी शहरांपासून आम्ही रसिकप्रेमी दूर जरी असलो तरी त्यांचे प्रचंड (डाय हार्ट फॅन) चाहते रसिक प्रेक्षक आहेत.तरी जेषठ व श्रेष्ठ मा.श्री.सचिन सुनीला शरद पिळगांवकर सर अशा असामान्य व अष्टपैलु व्यक्तिमत्त्वाच्या सोहळ्यास माणगांव – रायगड ( कोकण) मधील सर्व माय – बाप रसिक प्रेषकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजिक व सक्रेटरी सौ.अंकीता अजय मोरे यांनी केले आहे..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट