जागतिक लोकसंख्या दिन जिल्हा परिषद पालघर मध्ये साजरा…

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर :-दिनांक ११ जुलै २०२४ रोजी पालघर येथे लोकसंख्या स्थिरता पंधरवड्याची सुरुवात झाली.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर मार्फत जागतिक लोकसंख्या दिन ११ जुलै २०२४ रोजी साजरा करण्यात आला, सदर कार्यक्रमात कुटुंब कल्याण कार्यक्रमात ज्या डॉक्टर व सर्जन,. अधिकारी, कर्मचारी यांनी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली त्यांच्या गुणगौरव करण्यासाठी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, सर्व सर्जन /अधिकारी/कर्मचारी यांचा सन्मान श्री.प्रकाश निकम, अध्यक्ष जिल्हा परिषद पालघर, श्री. भानुदास पालवे- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, श्री.पंकज कोरे, उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर तसेच श्री.संदेश ढोणे, सभापती, आरोग्य व बांधकाम. श्री..संदीप पावडे सभापती, कृषी व पशू, श्रीम.मनीषा निमकर सभापती, समाजकल्याण, श्रीम.रोहीणी शेलार, सभापती, महिला व बालविकास व सर्व सन्मा. स्थायी समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य यांचे शुभहस्ते करण्यात आला.
जिल्ह्यात सर्वात जास्त कुटुंब नियोजन शस्रक्रिया करणारे डॉ.राजेंद्र चव्हाण, डॉ.राजेंद्र तिवारी, डॉ.गणेश ठाकरे, डॉ.प्रभाकर भोये यांचा गौरव करण्यात आला, तसेच जिल्ह्यात सर्वात जास्त कुटुंब कल्याण कामकाज करून घेणारे डॉ.संदीप निंबाळकर,तालुका आरोग्य अधिकारी विक्रमगड , डॉ संदीप गाडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डहाणू यांचाही सन्मान करण्यात आला, त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र – तलवाडा व प्राथमिक आरोग्य केंद्र उधवा येथील अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला, तसेच प्रा.आ.केंद –तारापूर, सायवन येथे प्रसूतीपश्चात तांबी (PPIUCD) चे उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य सेविका यांचाही सन्मान करण्यात आला.





जिल्ह्यामध्ये दिनांक ११ जुलै २०२४ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा राबविण्यात येणार आहे, या कालवधीत प्रत्यक्ष कुटुंब नियोजन सेवा देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे, तसेच कुटुंब नियोजनाच्या पाळणा लांबविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती योग्य जोडप्यांना आवश्यकतेनुसार पुरविण्यात येऊन त्याचा प्रचार, प्रसार व सेवा पुरविणे इत्यादी कामकाज करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाबाबत डॉ.संतोष चौधरी जिल्हा आरोग्य अधिकारी पालघर तसेच डॉ.सागर पाटील,जिल्हा प्रजनन व बालसंगोपन अधिकारी पालघर यांनी माहिती दिली.
“जागतिक लोकसंख्या दिन २०२४” करीता यावर्षी जागतिक लोकसंख्या दिनाची शीर्षक (थीम) खालीलप्रमाणे आहे.
“माता आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी दोन अपत्यात योग्य अंतर ठेवा”
यावर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची घोष वाक्य खालीलप्रमाणे आहे.
“ओळख नव्या विकसित भारताची कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याची”
वरील सत्कार समारंभामध्ये जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com