कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीमध्ये विविध सोयी सुविधांसाठी दीड कोटी रूपयांचा निधी देणार – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे..

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

सांगली : सांगली, दि. 9 ऑक्टोबर 2022 रोजी (जि. मा. का.) : कामगारांच्या तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांबाबत अडचणी मांडाव्यात. कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीमध्ये विविध सोयी सुविधा देण्यासाठी दीड कोटी रूपयांचा निधी जिल्हा नियोजन मधून देवू, अशी ग्वाही कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी दिली.

औद्योगिक वसाहत सांगली येथील ललित कलाभवन येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय सांगली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गटस्तरीय कामगार पुरूष व व महिला खुली भजन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी वसंतदादा औद्यागिक सहकारी सोयायटी लि. सांगलीचे चेअरमन सचिन पाटील, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, प्रभारी कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार, सहाय्यक कल्याण आयुक्त समाधान भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव, विशेष कार्य अधिकारी प्रमोद फडणवीस, रमेश आरवाडे, सतिश सलगर, रंगराव इरळे, आदि मान्यवर उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीमध्ये विविध सोयी-सुविधा देण्यासाठी तसेच नुतनीकरणासाठी त्वरीत अंदाजपत्रक तयार करावे, अशा सूचना देवून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, भजन स्पर्धेत संघाना सादरीकरणासाठी असणारे सध्याचे मानधन कमी असून त्यांचे मानधन वाढवावे. कामगारांना आरोग्य विषयक किंवा इतर कोणतीही अडचण आली तर त्यांनी त्वरीत संपर्क साधावा, त्यासाठी निश्चित मदत करू अशी ग्वाही देवून विजेत्या संघाचे अभिनंदन करून सर्व संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
वसंतदादा औद्यागिक सहकारी सोयायटी लि. सांगली चे चेअरमन सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीमध्ये वुडन बॅडमिंटन कोर्ट तसेच इमारतीच्या नुतणीकरणासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली.

भजन स्पर्धेत महिला व पुरूषांच्या प्रत्येकी 10 संघानी सहभाग घेतला होता. खुली महिला भजन स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त कामगार कल्याण केंद्र अकोला वासुद, व्दितीय क्रमांक प्राप्त कामगार कल्याण केंद्र मांजर्डे, तृतीय क्रमांक प्राप्त ललित कला भवन सांगली, तर कामगार पुरूष भजन स्पर्धेतील प्रथक क्रमांक प्राप्त कामगार कल्याण केंद्र कुंडल, व्दितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र सातारा व तृतीय क्रमांक प्राप्त कामगार कल्याण केंद्र मंगळवेढा या संघाना पालकमंत्री डॉ. सुरेख खाडे यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्याचबरोबर उत्कृष्ठ गायक, पेटीवादक व तालसंचनमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त महिला व पुरूष यांनाही पारितोषिक वितरीत करण्यात आले. गंभीर आजार उपचार सहाय्यता योजनेंतर्गत प्रतिकात्मक धनादेशाचे वितरण कल्पना ओळेकर, दादासो शेळके, निलांबरी पवार, अविनाश मोरे, सचित औटे, सुरेश कदम यांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्रथम क्रमांक प्राप्त महिला व पुरूष संघाने पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत सादरीकरण केले.
स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी केले. आभार सहाय्यक कल्याण आयुक्त समाधान भोसले यांनी मानले. या कार्यक्रमास स्पर्धा परीक्षक दिलिप टोमके, अरूण जोशी, गीता दातार, भजनी मंडळाचे महिला व पुरूष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या सोमवार, दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजीच्या सांगली जिल्हा दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता दास बंगला निवासस्थान विश्रामबाग सांगली येथून मिरजकडे प्रयाण ,सकाळी 11 वाजता जनसंपर्क कार्यालय येथे आगमन व कार्यालयीन कामकाज. दुपारी 1.30 वाजता जनसंपर्क कार्यालय येथून दास बंगला निवासस्थान विश्रामबाग सांगलीकडे प्रयाण, दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3.30 वाजता दास बंगला निवासस्थान विश्रामबाग सांगली येथून मिरजकडे प्रयाण, दुपारी 4 वाजता वंजाले पेट्रोलिअम पंप उद्घाटन समारंभ,
स्थळ – मिरज-पंढरपूर रोड शासकीय मेडिकल कॉलेजसमोर मिरज. दुपारी 4.15 वाजता शासकीय मेडिकल कॉलेज मिरज येथून तानंग ता. मिरजकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता तानंग ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. सायंकाळी 5 वाजता कळंबी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. सायंकाळी 6 वाजता सिध्देवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. सायंकाळी 6.30 वाजता पाटगाव ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. सायंकाळी 7 वाजता सोनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. सायंकाळी 7.30 वाजता करोली एम ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. रात्री 8 वाजता भोसे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. रात्री 8.30 वाजता भोसे येथून दास बंगला निवासस्थान विश्रामबाग सांगलीकडे प्रयाण. रात्री 9 वाजता दास बंगला, सांगली येथे आगमन व राखीव. रात्री 9.30 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण असा आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट