वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाईन फसवणुकीतील रक्कम ८ लाख ५० हजार परत करण्यास काशिमीरा पोलीसाना मोठे यश !!

0
Spread the love

प्रतिनिधी-अक्षय कांबळे

मिरा रोड:

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पोलीस स्टेशन परीसरात राहणा-या श्रीमती. किर्ती सिंग यांना वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाईन युटयुब व्हिडीओ लाईक टास्क, ऑनलाईन हॉटेल / मुव्ही रेटिंग यांना लाईक अथवा टास्क पुर्ण करुन गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवून ८,५०,००० /- रुपयांची आर्थिक फसवणुक झाली होती. सदर फसवणुकीच्या अनुषंगाने काशिमीरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजी नंबर ६८० / २०२३ भादवी कलम ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनीयम कलम ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

नमूद तक्रारीबाबत तात्काळ गुन्हा दाखल करुन घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळया बँक खात्यात वळती झाल्याचे दिसुन आले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बँकेसोबत पत्रव्यवहार करुन संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर मा. न्यायालयाकडुन तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरीता काशिमीरा पोलीस ठाणेचे अधिकारी / अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणुक झालेल्या सुपर्ण रक्कम ८,५०,००० /- रक्कम त्यांचे खात्यावर परत मिळविण्यात आली आहे.

अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…

• Telegram Channel, facebook, Instagram अथवा Watsapp वर जास्त परतावा देणा-या Promotional Adds वर विश्वास ठेवु नका. याद्वारे आपली आर्थिक फसवणुक होण्याची शक्यता आहे. • अश्या प्रकारच्या फसवणुकीमध्ये Telegram Channel, Watsapp Group वर अॅड करुन तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे Sceenshot, Massages दाखवुन पैसे गुंतवणुक करण्यास प्रवृत केले जाते. गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही लोकांचे बॅक स्टेटमेंट मध्ये त्यांना फायदा झालेली रक्क्म दाखवुन फसवणुक करण्यात येते. एकदा गुंतवणुकदारांचा विश्वास जिंकला की, हे लोक गुंतवणुकदारांना जास्त व खात्रिशिर परताव्याची हमी देतात. अशा गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणुक होण्याचा धोका मोठया प्रमाणात असतो.

· Work From Home
Online You Tube Video Like Tasks, Hotel/Movie Rating

या सारखा गुंतवणुक करण्या-या बनावट जाहिरातींना बळी पडू नये.

• कोणतेही अनाधिकृत अॅप्लीकेशन डाऊनलोड करु नये अथवा अनोळखी लिंकवर क्लिक करुन नये. • ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.

सदरची कामगिरी श्री. प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परि ०१, मिरा रोड, श्री. विजयकुमार मराठे, सहा.पोलीस आयुक्त, मिरा रोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक श्री. राहुल सोनवणे, पोलीस उप निरीक्षक वैभव धनावडे, पो हवा / ०६२०६ दिनेश आहेर यांनी पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट