नालासोपारात संत गोन्सालो गार्सिया सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शानदार पालकदिन साजरा

नालासोपारा :- नालासोपारा पश्चिम येथे संत गोन्सालो गार्सिया विद्यालयात पालक दिन सोहळा शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी२०२३ रोजी शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सभागृह संपूर्णतः पालकांनी फुलून गेले होते. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय श्री. मायकल लोपिस सर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून तंत्रज्ञान विषयक तज्ञ शाळेचे माजी विद्यार्थी श्री जोएल जोसेफ परेरा हे उपस्थित होते.









शाळेचे आदरणीय प्राचार्य
रेव्ह .फादर विजय लोबो यांनी कार्यक्रमाचे सुंदरसे प्रास्ताविक केले.



प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री सेवर्ल्स सर यांनी मान्यवरांची ओळख व स्वागत केले.
शाळेचे सन्माननीय मॅनेजर रेव्ह .फादर जॉन्सन मिनेझिस यांनी सुंदर शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या सेवेची 25 वर्षे पूर्ण करणारे श्री स्वप्नील परेरा, श्री लॉरेन्स फरगोज, सौ. अपर्णा परेरा व शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती हेडवीजीस परेरा आदींचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
जवळजवळ 250 विद्यार्थ्यांनी विविध अंगी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे महिला शिक्षकानी मंगलागौरी या संगीतावर ठेका धरून सर्वांना चकित केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कुमारी शिफा शेख व कुमार नुरेन शेख या विद्यार्थ्यांनी पार पाडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचे अपर्णा परेरा यांनी आभार मानले व शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
मनोरंजन व नैतिकतेने भरलेला असा हा मूल्याधिष्ठित पालक दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com