महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिलांच्या मोटार सायकल रॅलीचे आयोजन..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नंदुरबार :- 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी व अमलदार यांची मोटार सायकल रॅली आयोजित केली होती. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ऑपरेशन अक्षता या उपक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर जनमानसात बाल विवाह विरोधी जनजागृती करणे हा मोटार सायकल रॅलीमागील मुख्य उद्देश होता. सदर मोटार सायकल रॅलीच्या वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचेसह नंदुरबार जिल्ह्यातील इतर अधिकारी व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सुमारे 150 महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार हेल्मेटसह सहभागी झाले होते.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिला पोलीस अधिकारी व अमलदार यांची मोटार सायकल रॅलीचे आयोजन केल्यामुळे ती पाहण्यासाठी नंदुरबार शहराच्या रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. सदर मोटार सायकल रॅलीला नंदुरबार शहरातील नागरिकांनीही तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार यांच्या मोटार सायकल रॅलीवर फुलांचा वर्षाव करुन रॅलीचा उत्साह वाढविला.

सदर मोटार सायकल रॅलीला सकाळी 11.30 वाजता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील व डॉ. श्रीमती तेजल चौधरी, लायन्स क्लब, नंदुरबार यांनी हिरवा झेंडा दाखविला. मोटार सायकल रॅली समोर पोलीस बँड पथकाने देशभक्तीपर गीते वाजवून लोकांमध्ये व रॅलीमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले. सदरची रॅली ही पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथून निघून नवापुर चौफुली, साक्री नाका, सोनार खुंट, हाट दरवाजा, सिंधी कॉलनी, C.B. पेट्रोल पंप व तेथुन गांधी पुतळा, नेहरु पुतळा, नगर पालिका, आंधारे चौक, धुळे चौफुली, नवापुर चौफुली व पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या मार्गाने रॅलीने मार्गक्रमण केले. पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे सदर रॅलीचासमारोप झाला, महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार यांच्या रॅलीने नंदुरबारवासीयांचे लक्ष वेधून महिला शक्तीचे प्रदर्शन केले. महिला पोलीस अधिकारी व अमलदार यांनी काढलेल्या मोटार सायकल रॅलीने महिलांना जणू काही एक प्रकारे सुरक्षेची हमी दिली. मोटार सायकल रॅलीतील सहभागी महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार यांनी बाल विवाह प्रतिबंधक उपक्रमाचे फलक हाती घेवून जनजागृती केली.

सदरची मोटार सायकल रॅली चालू असतांना रॅलीच्या मार्गावर उपस्थित असलेले लोक त्यांच्या मोबाईलमध्ये मोटार सायकल रॅलीचे चित्रीकरण करत होते तसेच टाळ्या वाजवून मोटार सायकल रॅलीचे
मनोबल वाढवत होते.

सदर मोटार सायकल रॅलीच्या वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचेसह नंदुरबार जिल्ह्यातील इतर अधिकारी व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सुमारे 150 महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार ह्या हेल्मेटसह रॅलीला उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट