महिला आयोग आपल्या दारी” – महिलांच्या न्यायासाठी एक ठोस पाऊल !

सह संपादक – रणजित मस्के
पुणे




आज पासून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा तीन दिवसांचा पुणे जिल्हा दौरा सुरु करताना, “महि ला आयोग आपल्या दारी” उपक्रमा अंतर्गत पुणे शहर विभागासाठी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे जनसुनावणी घेण्यात आली.
महिला आयोगाचे मुख्यालय मुंबईत असले तरी प्रत्येक महिलेला तिकडे पोहोचणे शक्य होत नाही. याच कारणामुळे आयोग स्वतः आपल्या जिल्ह्यांमध्ये येत आहे कारण न्याय हा प्रत्येक महिलेला तिच्या दारी मिळायला हवा, हेच आमचं ध्येय आहे.
आज पुण्यात या उपक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला आणि आपले प्रश्न, तक्रारी ठामपणे मांडल्या.आजच्या जनसुनावणीत १२३ तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्यात आली. या तक्रारी प्रामुख्याने कौटुंबिक छळ, मालमत्ता व इतर गंभीर विषयांशी संबंधित होत्या. एकाच छताखाली पोलिस, प्रशासन आणि संबंधित विभाग उपस्थित असल्यामुळे महिलांच्या तक्रारींवर त्वरित निर्णय घेणे शक्य झाले.
जनसुनावणी बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनिषा बिरारीस, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीयुत गिरासे उपस्थित होते.
तसेच तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने रुग्णालयासाठी मार्गदर्शक तत्वे (SOP) असाव्या अशी आयोगाची भूमिका होती. त्याबाबत उपसंचालक आरोग्य डॉ. राधाकिसन पवार, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांनी आपला अहवाल आयोगास सादर केला. त्या अनुषंगाने सादर केलेल्या अहवालावर आधारित पुढील पावलं उचलली जातील.
पुढील जनसुनावण्या:
१६ एप्रिल – जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे ग्रामीण
१७ एप्रिल – पिंपरी चिंचवड
महिलांनी धैर्याने पुढे यावे, आयोग आपल्या सोबत आहे !