बार्शी एस. टी. स्टॅन्ड येथे गर्दीचा फायदा घेवुन जबरी चोरी करणाऱ्या महिलेस बार्शी शहर पोलीसानी ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सोलापूर:- दि. 25/12/2024 रोजी दुपारी 03/30 वा. ते सायंकाळी 04/30 वा. चे दरम्याण एस. टी. स्टॅण्ड बार्शी येथे दोन अनोळखी महिला यांनी फिर्यादी नामे मायादेवी प्रदिप पाटील वय 50 वर्षे रा. गोलेगाव पो. पारडी ता. वाशी जि. धाराशिव यांचे गळ्यातील 1,20,000/- रु किंमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेडंट असलेले सोन्याची साखळी असलेले गंठण तसेच साक्षीदार नामे सुनिता बबनराव आगळे का.रा. आगळगाव ता. बार्शी जि.सोलापुर सध्या रा.टि.पी.सी. रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे गळ्यातील 75,000/-रु किंमतीचे सोन्याचे साखळीचे 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण त्यास काळे मणी तसेच दोन डोरली असलेले गंठण फिर्यादी व साक्षीदार यांना धक्का देवुन गळ्यात हात घालुन जबरीने काढुन चोरुन नेले आहे. म्हणून फिर्यादीची त्यांचे विरुध्द बाशीं शहर पोलीस ठाणे गु.र. नं. 1161/2023 भा.द.वी. कलम 392,34 प्रमाणे तक्रार दिलेली आहे.

तरी सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान गोपनिय बातमीदारामार्फत व तांत्रीक तपासाव्दारे एक महिला मिळून आली तिच्याकडे सदर घडले गुन्हयाचे अनषधाने तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्यानी त्यांचेकडुन सदर गुन्हयात चोरून घेवुन गेलेला मुददेमाल मिळुन आल्याने गुन्हयातील महीला आरोपी नामे 1) सखुबाई सखाराम कुन्हाडे वय 46 वर्षे रा. गांधीनगर खडकपुरा बीट ता. जि. बीड हिस सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून वरील 1,95,000/-रु किंमतीचा सर्व मुददेमाल तात्काळ हस्तगत करुन सदर गुन्हयात जप्त करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास पोना/739 प्रदिप पायधन हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री शिरीष सरदेशपांडे सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री प्रितम यावलकर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री जालिंदर नालकुल सो, पोलीस निरीक्षक मा. श्री आण्णासाहेब मांजरे सो. यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक श्री महेश गळगटे, पोहेकॉ/317 रियाज शेख, पोहेकॉ/304 शैलेश चौगुले, पोना /1162 मनिष पवार, पोकों/1995 सचिन नितनाथ, पोकॉ/1974 सचिन देशमुख, पोकों/2205 रोहीत बागल, पोकॉ/2111 अंकुश जाधव, पोकॉ/1909 शरद वाघमोडे, पोकों/ प्रल्हाद अकुलवार, पोकों/787 अविनाश पवार, पोकों/200 राहूल उदार, पोकॉ/ धनराज फत्तेपुरे, पोकॉ/412 मोहन कदम, पोकों/2224 सचिन अंकुश सायबर पोलीस ठाणेचे पोकों / रतन जाधव यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट