महिला सुरक्षिततेसाठी महिला आघाडींचे ठाणे नगर पोलीसाना निवेदन – मीनाक्षी शिंदे…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

ठाणे: ठाण्यात दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी एका काॅलेजच्या मुलीच्या झालेल्या छेडछाडीच्या पोलीसांच्या तत्परतेने केलेल्या कारवाईचा बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी महिलांनी यथोचित सन्मान केला. यावेळी ठाण्यात महिला सुरक्षिततेसाठी महिला आघाडी तर्फे पोलीसांना एक निवेदन देण्यात आले.


ठाण्यातील स्टेशन रोड परिसरात 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळच्या सुमारास एका काॅलेज तरुणीला रिक्षा चालकांनी फरफटत नेत ओढल्या बाबतची घटना घडली होती.परंतु पोलीसानी तत्परतेने कारवाई करून आरोपीस अटक केली होती त्याबाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी ताई शिंदे यानी ठाणे नगर पोलीस स्थानकातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयराज रणवरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व आभार मानले.
तसेच या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सकाळच्या वेळी पोलीसांची गस्त वाढवावी व त्या ठिकाणी पोलीस व्हॅन उपलब्ध करून द्यावी असे निवेदन देण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट