सांगली जिल्हा पोलीस दलातील उमदी महिला पोलिसांनी केली अंवैध धंदे विरोधी धडक कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली:
आता महिला पोलिसांपासून सावधान…! आता फक्त कार्यालयीन कामकाज नाही तर थेट मैदानात…


जत तालुक्यातील उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बांलगाव व मरबगी येथील अंवैध धंदे करणाऱ्या लोकांनवरती पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली व अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या संकल्पनेतून डिवाएसपी सुनिल सांळुखे मार्गदर्शनाखाली संपोनि संदीप शिंदे यांनी उमदी पोलीस ठाणे कडील महिला पोलीस नाईक जानवी शिवानंद राणे, पुजा संजय घार्गे, महिला अंमलदार रेणुका कुमरे, छाया बाबर यांना स्वतः कोणाचीही मदत न घेता यांनी उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छुप्या मार्गाने सुरू असलेल्या अंवैध माहिती घेऊन रेड करण्याचा टास्क दिला होता.
सदर महिला पोलीस अंमलदार यांनी हम किसीसे कम नही हे दाखवून देत मरबगी येथील अवैध दारू विक्री करणार्या यादबी चाँदसाब नदाफ, सुवर्णा लकप्पा सोनकनळ्ळी व बांलगाव येथील चंद्राम रेवण्णाप्पा कांबळे यांच्यावर छापा टाकून देशी दारूच्या बत्तीस बाटल्यांसह गावठी दारू पकडून मोठी कारवाई केली आहे.
नेहमीच कार्यालयीन व कमी जबाबदारीची कामे महिला पोलीस अंमलदार यांना दिली जातात. परंतु सांगली पोलीस दलातील महिला अंमलदार यांनी कोणाचीही मदत न घेता ही स्वतः कारवाई करून त्या सक्षम आहेत हे दाखवून दिले आहे.
उमदी महिला पोलीस अंमलदार यांच्या या कारवाईमुळे सर्व सामान्य जनतेत मात्र समाधान व्यक्त होत आहे. उमदी पोलिसांनी गेल्या महिन्यात हद्दीत गांजावरील मोठी कारवाई करुन कामाची झलक दाखवून दिली होती. सपोनि संदीप शिंदे यांनी महिला पोलिस कर्मचारी यांना मैदानात उतरवत आपल्या कामाची वेगळीच चुनूक दाखवल्याने अंवैध धंदेवाल्यांचे धांबे दणाणले आहेत. ये तो ट्रेलर है पिंचर अभि बाकी है असाच इशारा दिला असल्याचे दिसून येते.
पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांचे संकल्पनेतून नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविण्याच्या प्रयत्न उमदी पोलीस ठाणे कडून केले जात आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com