अतिदुर्गम नक्षलग्रस्त तिरखुरी या गावात पोलीस दादालोरा खिडकी योजना अंतर्गत केशोरी पोलीस स्टेशनने स्थापन केला महिला करीता बचत गट…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. गोंदिया जिल्हाच्या टोकावर गडचिरोली जिल्हयाचे सिमेलगत पोलीस ठाणे केशोरी अंतर्गत मौजा तिरखुरी हे नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील गाव आहे. अतिदुर्गम जंगल परिसरातील या गावामध्ये शासनाच्या योजना पोहोचल्या नसल्यामुळे तिरखुरी गावातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विवीध योजनाबाबत माहिती देवुन त्या ठिकाणी शासनाच्या विवीध योजना पोहचाव्यात, तेथील महिला व युवकांना रोजगार मिळावा हा मानस मनाशी बाळगुन पोलीस ठाणे केशोरीचे ठाणेदार श्री. सोमनाथ कदम व अंमलदार यांनी तिरखुरी येथे वेळोवेळी भेट देऊन गावातील महीलांशी व लोकांशी हितगुज साधुन ” पोलीस दादालोरा खिडकी” योजने अंतर्गत दिनांक 10/06/2023 रोजी तिरखुरी गावातील महिलांना एकत्रीत करुन बचत गटाचे महत्व समजावुन सांगुन एकूण १४ महिलांचा “जय गोंडवाना महिला बचत गट” तिरखुरी ची निर्मीती केली.


सदर महीला बचत गट निर्माती करीता सौ.पुष्पा कराडे रा. भरनोली (सी.एल.एफ. मॅनेजर बचत गट), वनीता राजेंद्र मडावी (आय.सी. आर.टी.) रा. बोरटोला, संचिता अरुण उईके (सी. एल. एफ. अकाउन्टेंट) रा. धमदीटोला यांनी विशेष सहकार्य केले. बचत गटाचे फायदे व त्यांना मिळणारे शासनाचे विविध लाभ याबाबत देखील सर्व महिलांना मार्गदर्शन केले.
तिरखुरी गावातील महिलांनी देखील केशोरी पोलीस स्टेशनने केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त केले.
सदर कामगिरी मा. श्री.निखील पिंगळे,पोलीस अधीक्षक, गोंदिया, श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, यांचे मार्गदर्शनात केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम, मपोहवा पुनम हरीणखेडे, मपोशि निशा बोंदरे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com