बंदूक सर्व्हिसिंग करताना पायाला गोळी लागल्याने महिला पोलीस नुतन लाड जखमी…

उपसंपादक-राकेश देशमुख
पेण :–

दादर सागरी पोलीस ठाण्यातील जखमी महिला पोलीस नूतन रामचंद्र लाड यांची प्रकृती स्थिर…
रायगड जिल्ह्या पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचारी बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटल्याने जखमी झाली आहे. बंदूक साफ करताना पायाला गोळी लागली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर महिला पोलीस यांना उपजिल्हा रुग्णालय पेण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, दादर सागरी पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचारी नूतन रामचंद्र लाड या पोलीस स्टेशनमध्येच बंदूक सर्व्हिसिंग करत असताना अचानक बंदुकीची गोळी सुटली, सदर गोळी नूतन लाड यांच्या पायाला घासून गेल्याने त्या जखमी झाल्या आहेत. त्यांना त्वरित पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र नंतर त्यांना अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळतंय.
सदर घटना समजताच रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, दादर सागरी प्रभारी अधिकारी नागेश कदम आदींनी तात्काळ रुग्णालयामध्ये भेट दिली. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास दादर सागरी पोलीस करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com