जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्या २४ तासाच्या आत उंब्रज पोलीस टीमने आवळ्या मुसक्या..

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा
दिनांक १८/०८/२०२३ रोजी सायंकाळी ६.०० वा. सुमारास मौजे शिवडे ता. कराड गावचे हद्दीत पुणे ते बेंगलोर हायवे लगतचे हॉटेल विसावा परमिट रूम बिअर बारचे समोर आरोपी नामे १) राज शिवाजी हजारे, २) सुरज भगवानसिंग हजारे, ३) राकेश ऊर्फ मुन्ना जालिंदर घाडगे सर्व रा. उंब्रज ता. कराड यांनी आकाश प्रभाकर पवार रा. उंब्रज ता. कराड यांना व त्यांचा मित्र विवेक देशमुख यांना दरु पिण्यासाठी पैसे दे असे म्हणुन लाथाबुक्याने व दगडाने मारहाण करुन फुटलेली बाटली पोटात खुपसून जिर्व मारीन अशी भिती दाखवून आकाश प्रभाकर पवार यांचे पॅन्टच्या खिश्यातून १,०००/- रुपये व मोबाईल फोन जबरदस्तीने काढून वरील रेकॉर्ड वरील आरोपी हे सदरचा गुन्हा करून पसार झाले होते. त्याबाबत वरील आरोपी क्र. १ ते ३ यांचे विरुध्द उन्ब्रज पोलीस स्टेशनला तक्रार दिल्या वरुन उंब्रज पोलीस स्टेशन येथे गु. २. नं. ५१३/२०२३ भादंवि कलम ३९७, ३२४, ३२३, ५०४, ५६, ३४ प्रमाणे दाखल करणेत आलेवर सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांनी पोलीस टीम तयार करून पसार झालेले रेकॉर्ड वरील आरोपीस पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील व डी. बी पथकाने एक आरोपीस कराड रेल्वे स्टेशन येथून व दुस-या आरोपीस सातारा येथे शिताफिने ताब्यात घेतले आहे. सदर दोन्ही आरोपींत यांचेकडे विचारपुस करून तिसन्या आरोपीस ताब्यात घेणेत आले आहे.

अशा प्रकारे उंब्रज गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरी चोरी करणारे रेकॉर्ड वरील गुन्हेगाराना गोपनीय व तांत्रिक माहितीचे अधारे २४ तासाच्या आत जेरबंद करणेत आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सो, सातारा श्री. समीर शेख साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो, श्री. बापू बांगर साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, श्री. अमोल ठाकुर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक, महेश पाटील, पोलीस उपिनीक्षक अनिल पाटील, पो. कॉ. मयूर थोरात, पो. कॉ. राजकुमार कोळी, पो. कॉ. गणेश कुंदे, पो. कॉ. सागर साळे, सायबर शाखेचे पोलीस अंमलदार तसेच होमगार्ड नागेश पाटील यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपिनीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com