पोलीस बॉईज संघटना व वाणगाव पोलीसांच्या मदतीने चिंचनीतील अनुचित प्रकारास आळा..
प्रतिनिधी – मंगेश उईके
वाडा :-रविवार दिनांक ०९/०६/२०२४ रोजी पहाटे ०३.०० वाजताच्या सुमारास तारापूर चिंचण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांना ग्रामरक्षक/ सागरी सुरक्षा दलाचे पोलीस बॉईज संगठनाचे डहाणू तालुका अध्यक्ष प्रसाद वझे यांनी फोन वरून वानगाव नाका येथे एक अनोळखी इसम लोकांचे दरवाजे ठोकत आहे व त्याचे कपड्यांवर रक्ताचे डाग दिसून येत आहेत असे कळविले.

लागलीच घटनास्थळी रात्र गस्तीचे अंमलदार ASI संखे व PN शनवार यांना तात्काळ प्रसाद वझे यांचे बरोबर संपर्क साधून घटनास्थळी पाठविले. त्यावेळी रात्र गस्तीचे अमलदार व प्रसाद वझे, ऋषिकेश वझे , राजू बारी हे एकत्रित घटनास्थळी गेले असता सदर ठिकाणी एक इसम नामे राजू हेमाडे वय 27 वर्षे मिळून त्याच्याकडे चौकशी करता समजले की तो व त्याचे मित्र आकाश जगदीश घरत, तसेच केतन राजू लोखंडे दोन्ही राहणार सफाळे टेंभी खोडावे हे श्री हेमंत अनिल पठारे राहणार चिंचणी यांचे घरी पेंटिंगचे कामानंतर जेवण झाल्यानंतर त्यांचे वाद व हातापायी झाली त्यामध्ये निवास राजू हेमडे हा खाली पडल्याने त्याचे डोक्याला मार लागला.
त्यानंतर मदतीसाठी वाणगाव नाका येथील घरांचे दरवाजे वाजवीत असल्याचे समजले. त्यानंतर त्यास तत्काळ ग्राम रक्षक दलाचे सदस्य व पोलिसांनी त्याला तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार केलेला आहे.व वरील सदर इसमावर तारापूर चिंचण पोलीसानी अधिनियम 110, 112, 117 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
सागर रक्षक दलाचे व पोलीस बॉईज संघटनाचे डहाणू तालुका अध्यक्ष प्रसाद वझे व टीम यांच्या प्रसंगावधानमुळे वेळेत सहकार्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. तरी वाणगाव पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी ग्रामस्थांना सूचीत करण्यात आलेकी , गावात कोणीही संशयित व्यक्ती आढळून/दिसून आल्यास तात्काळ वाणगांव पोलीस स्टेशन 8669604047 या नंबरवर.
संपर्क साधावा असे आवाहन
तुषार पाचपुते पोलीस निरीक्षक
वानगाव पोलीस ठाणे यांनी केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com