सीसीटिव्हीच्या मदतीने सराईत घरफोडी करणारा टोळीप्रमुख त्याचे साथीदारांसह अटक…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पुणे :- लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २७७/२०२४, भा. न्या. रां. २०२३ चे कलम ३०५, ३३१(२), ३३१(४) ३(५) मधील फिर्यादी झहिर अब्यास लाखानी, रा. कोंढवा, पुणे यांचे मालकीचे सेल एक्सप्रेस या नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान मरियम मंझिल, न्यु मोदिखाना कॅम्प, पुणे या ठिकाणी असुन, सदर दुकान दि. ०३/१२/२०२४ रोजी रात्री दरम्यान बंद असताना दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी घर फोडी करून दुकानातील वनप्लस व ओपो कंपनीचे एकुण १० मोबाईल किंमत रुपये ४४,०००/- असा माल घरफोडी चोरी करून चोरून नेला आहे, प्रस्तुत प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द दि. ०३/१२/२०२४ रोजी लष्कर पो. स्टे. येथे वर उल्लेखीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफोडी चोरी करणारे गुन्हेगारांबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसताना, वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली लष्कर पो. ठाणे कडील तपास पथकाचे पो अधिकारी प अंमलदार यांनी घटनास्थळावरील तसेच आजुबाजुचे परिसरातील सी सी टि व्ही फुटेज पडताळुन पाहणी केली असता, तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातुन मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली, व अथक प्रयत्नाने रात्रीचे वेळी पहाटे ०२/१५ वा चे सुमा. सापळा रचुन गुन्ह्यातील आरोपी यांना पकडण्यात आले असुन त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे, सदर आरोपींची नावे १) शाहरूख सलाउचीन खतीथ, यय २४ वर्ष, रा. घर क्र. २०४, गल्ली क्र. २५, भाग्योदय नगर, किर्ती इमारतीसमोर, कोंढवा, पुणे, २) सलिम हसन शेख, चय २४ वर्ष, रा. शेख अब्दुल रेहमान चौक, कासेवाडी, भवानीपेठ, पुणे, ३) सर्फराज पाशा शेख, चय २२ वर्ष, रा. शेख अब्दुल रेहमान चौक, कासेवाडी, भवानीपेठ, पुणे, ४) अजीम बबलु शेख, वय २० वर्ष, रा. भगवा चौक, कासेवाडी, भवानीपेठ, पुणे, अशी असुन ते सर्व जण काहीएक काम धंदा करीत नसुन आरोपी शहारूख खतीब हा पोलीसा अभिलेखावरील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती प्राप्त झाली असुन त्याचेवर एकुण ०५ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना मा. न्यायालयात हजर केले असता, त्यांची दि. ०९/१२/२०२४ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. उपरोक्त आरोपींनी खडक, समर्थ, लष्कर, स्वारगेट परिसरात घर फोडी चोऱ्या केल्या असल्याची दाट शक्यता असल्याने त्या दृष्टिने त्यांच्याकडे तपास चालु आहे. आरोपींकडून लष्कर पो. स्टे कडील दाखल गुन्ह्यातील एकूण ४४,०००/- रु. किंमतीचे यन प्लस च ओपो कंपनीचे एकुण १० मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पो. उप. निरिक्षक राहुन घाडगे, हे करीत आहेत.

उपरोक्त कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. अप्पर पोलीस आयुक्त साो, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री. स्मार्तना पाटील, परि. २, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. दिपक निकम, लष्कर विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गिरिषकुमार विधायकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) प्रदिप पवार, पोलीस उप निरिक्षक राहुल घाडगे, यांचे नेतृत्वाखाली, तपास पथकातील पोलीस अंमलदार पो. हवा. महेश कदम, पो. हवा. सोमनाथ बनसोडे, पो. हवा. संदिप उकिर्डे, पो. हवा. रमेश चौधर, पो. ना. सचिन मांजरे, पो. शि. लोकेश कदम, पो. शि. हराळ, पो. शि. कोडिलकर, महिला पो. शि. अल्का ब्राम्हणे, यांनी केलेला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट