चाकूने भोसकून पळुन जाणारा आरोपी पकडण्यात सांताक्रूझ पोलीसांना पोलीस बाॅईज संघटनेच्या श्री. निलेश थोरात यांचे मोलाचे सहकार्य…!

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई-सांताक्रुज:

सांताक्रुज पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 7/10/23 रोजी रात्री 01 वाजेच्या सुमारास सांताक्रूझ स्टेशनच्या बाहेर जोरदार मारामारी चालू आहे, अशी माहिती मिळताच कर्तव्यावरील पोलीस हवालदार ब. नं. 03-1347 सुभाष अर्जुन गायकवाड यांनी सदर ठिकाणी धाव घेतली, तेव्हा 100 ते 150 लोकांचा जमाव जमला होता. दोन आरोपींनी एका इसमास चाकूने भोसकले होते. पोलीस हवालदार गायकवाड शिट्ट्या मारून जमाव पांगविण्यास सुरुवात करताना गर्दीचा फायदा घेऊन दोन्ही आरोपी रिक्षा पकडून पळून गेले होते.
तेव्हा पोलीस हवालदार गायकवाड यांनी आरोपींना कोणी ओळखता का? कोणी पाहिलं का, अशी जमावाकडे विचारणा केली असता कोणी समोर यायला तयार नव्हते.

परंतु सांताक्रुज येथे नोकरी करून घरी जाण्यासाठी निघालेले सामान्य नागरिक श्री निलेश यशवंत थोरात यांनी पोलीस हवालदार गायकवाड यांना मी त्यांना ओळखतो. मी पाहिले आहे मी तुम्हाला दाखवतो. ते रिक्षाने पळून गेले आहेत असे सांगताच पोलीस हवालदार गायकवाड व थोरात यांनी रिक्षाने पाठलाग सुरू केला. आरोपी पुढे गेल्यानंतर रिक्षा सोडून चालत जात असताना थोरात यांनी गायकवाड यांना दाखविले.

दोघेही दोन्ही आरोपीच्या दिशेने पळाले, पोलीस हवालदार गायकवाड व निलेश थोरात यांनी एक आरोपीस पकडले, परंतु दुसरा आरोपी पळून गेला. वेळीच प्रसंगावधान दाखवून पोलीस हवलदार सुभाष गायकवाड हे घटनास्थळी गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सामान्य नागरिक निलेश थोरात यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून पोलीस हवालदार गायकवाड यांना मदत केल्यामुळेच एक आरोपी पकडला गेला. त्यामुळे सांताक्रुज पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस हवालदार 03 1347 सुभाष गायकवाड व महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेचे माहीम तालुका अध्यक्ष श्री निलेश थोरात यांचे कौतुक करण्यात आले आहे.

गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनी सावंत यांनी दुसरा आरोपी रात्रीच अटक केला.

सदर बाबत सांताक्रुज पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर क्रमांक कलम866/23 कलम 307 34 अन्वये दाखल असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट