वाईन शॉपची घरफोडी करुन पसार झालेल्या सराईत चोरटयांना डोंबिवली पोलीसांनी अटक करुन त्यांच्याकडुन मुददेमाल हस्तगत केला…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

डोंबिवली :-दि.११/०६/२०२३ रोजी रात्री १०.३०वा ते दिनांक १२/०६/२०२३ रोजी पहाटे ३.१५ वा दरम्यान कालावधीत दरम्यान कालावधीत फिर्यादी नामे श्री रविंद्र रामण्णा शेटटी वय:- ६३ वर्षे धंदा:- वाईन शॉप राह. कल्पराज को. ऑप. हौ. सोसायटी रुम नं ३०६, ३०७, बी, विंग दुसरा मजला, डॉ. दिपक शेटटी मार्ग, बैलबाजार कल्याण पश्चिम यांचे मालकीचे डोंबिवली येथील डीलक्स वाईन शॉप मार्ट, डोंबिवली पूर्व येथील दुकानाचे शटर कशाने तरी सहायाने दोन ते तीन फुट वरती उचकटुन व आतील लोखंडी ग्रील उचकटुन आतप्रवेश करुन डाव्हरमधील एकुण :- ८,००,०००/- रुपये रोख रक्कम लबाडीच्या उददेशाने चोरी केली. म्हणुन फिर्यादीच्या तक्रारीवरुन डोंबिवली पोलीस ठाणे गु. र.क :- २०२/२०२३ कलम: – ४५७,३८० भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल केला.

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना डोंबिवली पोलीस ठाण्याचे सपोनि भराडे सपोनि सानप, पोहवा – १९२४/भणगे, पोहवा / ५०३ / वाघ, पोअ. ३४०६/ राठोड, पोअं८४१३ / सांगळे यांनी गुन्हयाचे घटनास्थळावरील तसेच आरोपीत येण्या-जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन तसेच तांत्रिक मदतीच्या आधारे नमुद गुन्हयात एकुण ३ आरोपीतांना निष्पन्न करुन सदर आरोपीतांना शिताफीने अटक करुन त्यांच्याकडुन अदयापपर्यंत एकुण :- ३,५०,०००/- रुपये गुन्हयातील रोख रक्कम हस्तगत केली. सदर आरोपीतांना एकुण ४ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असुन अधिक तपास सुरु आहे.

अटक आरोपीतांचे नाव व पत्ता:-
१) सरुउददीन ताजउददीन शेख वय ३२वर्षे धंदा :- बेकार राह. ६०३, यु.एस रेसिडन्सी अमृतनगर, शादीमहल रोड, मुंब्रा, जि ठाणे
२) जुबेर जलील अन्सारी वय २६वर्षे धंदा :- बेकार राह. दारुखाना झोपडपटटी, शिवडी मुंबई
३) शहाबुददीन ताजउददीन शेख वय ३२वर्षे धंदा :- बेकार राह. ६०३, यु. एस रेसिडन्सी अमृतनगर, शादीमहल रोड, मुंब्रा, जि ठाणे
वरील नमुद आरोपीतांपैकी आरोपीत क्रमांक: – ०१ याचेवर एकुण १५ घरफोडीचे गुन्हे दाखल असुन आरोपीत क :- ०२ याचेवर एकुण १४ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री दत्तात्रय शिंदे साो, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३, कल्याण श्री. सचिन गुंजाळ सो मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग श्री. सुनिल कुराडे साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन सांडभोर सो, यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि बळवंत भराडे, सपोनि योगेश सानप, पोहवा – १९२४ / भणगे पोहवा – ५०३ / विशाल वाघ, पोअ. ३४०६ / शिवाजी राठोड, पो. अं ८४१३ / नितीन सांगळे, पोहवा :- निसार पिंजारी/कोळसेवाडी पो.ठाणे यांनी कामगिरी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट