पत्नी ताडदेव पोलीस ठाण्यात येताच पतीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना…

0
Spread the love

मुंबई: ताडदेव पोलीस काॅलनी येथे बुधवार दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी घर सोडून गेलेली पत्नी पोलीस ठाण्यात आल्याचे समजताच पतीने पोलीस ठाण्यात जाऊन स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना ताडदेव पोलीस ठाण्यात घडली आहे. पोलिसांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवत तरुणाला तात्काळ नायर रुग्णालयात दाखल केले.
ताडदेव पोलीस कॉलनी येथे राहणाऱ्या वय ३० वर्ष या तरुणाचे २०२० मध्ये लग्न झाले. एकत्रित कुटुंबात राहणाऱ्या या तरुणाचे पत्नीसोबत नेहमी खटके उडू लागले होते आणि क्षुल्लक कारणावरून वारंवार भांडण होत असल्याने दोन दिवसांपूर्वीच पत्नी घरातून निघून गेली. बुधवारी या तरुणाने ताडदेव पोलीस ठाणे येथे जाऊन पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार घेऊन तिचा शोध सुरू केल्यानंतर तिला जबाब देण्यासाठी ताडदेव पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. सायंकाळी ही विवाहिता जबाब देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्याचे कळताच तिचा पती पोलीस ठाण्यात पोहचला. पोलीस ठाण्याच्या आवारात शिरण्याआधीच त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले व पत्नीसमोर जात त्याने स्वत: ला पेटवून घेतले. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्वरित त्याच्या अंगावरील आग नियंत्रणात आणली. या घटनेत भाजल्याने जखमी झालेल्या या तरुणाला तात्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास ताडदेव पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट