पश्चिम विभागीय गवळी समाज महिला मंडळाचा १७ वा हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

0
IMG-20250214-WA0017(1)
Spread the love

कांदिवली

प्रतिनिधी-सुशिल तांबे

पश्चिम विभागीय गवळी समाज महिला मंडळाचा १७ वा हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेह मेळावा चा कार्यक्रम नेताजी सुभाष चंद्र बोस क्रीडांगण पोयसर जिमखाना कांदिवली पश्चिम येथे मोठ्या थाटामाटात व उत्साहात पार पडला. हळदी कुंकवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांमध्ये उत्तम आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना एकत्रित आणणे आणि त्यांच्यामधील कलागुणांना वाव देणे यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे समाजाच्या अध्यक्ष श्री अनंतराव भालेकर यांनी सांगितले. तसेच भावी जीवनात समाजाचे आदर्श जपणारे व उंच स्वप्न बाळगून यशस्वी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करून त्यांना प्रोत्साहित करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सदरच्या कार्यक्रमांतर्गत कर्मावादी वृत्तीने समाजकार्य करणाऱ्या माजी नगरसेवक श्री आत्माराम चाचे साहेब, पोलीस खात्यातून राष्ट्रपदी पदकाचे मानकरी ठरलेले व सद्या खार पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री संजीव धुमाळ साहेब,उद्योजक श्री सुरेशजी वाजे व समाजसेवक श्री प्रकाश लटके यांना *समाज भूषण* या पुरस्काराने गौरवण्यात आले व त्यांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला खासदार श्री गोपाळ जी शेट्टी साहेब,त्यांच्या अर्धांगिनी सौ उषाताई शेट्टी, दिन दुबळ्यांच्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव श्री अरुण दादा सकपाळ,उप चिटणीस श्रीयुत केसरकर, नगरसेवक शिवा भाऊ शेट्टी, संध्या दोशी प्रतिभाताई गिरकर, बाळा तावडे , कमलेश यादव, दिलीप पंडित,तसेच महाराष्ट्र यादव दर्पण चे संस्थापक मा.राघव जी घाटवळ ,इंदिरा नगरचे हरीश माडविरकर, राजेश कासार शांताराम काते दत्ताराम बोबडे तानाजी काबदुले, शांताराम भालेकर वसंत मुरारी,चंद्रकांत बांडागले,महादेव भोजने,मनोहर महाडिक,विनोद पंदेरे,चंद्रकांत भालेकर,सुवर्णा महाडिक,शीतल महाडिक,सुवर्णा कोटकर,श्रुती भालेकर,वंदना पंदेरे,अशा अनेक मान्यवर ,पदाधिकारी,महिला वर्ग यांची उपस्थिती लाभली. सदरचा सोहळा पार पाडण्यासाठी *समाजाचे अध्यक्ष श्री अनंतराव भालेकर* यांनी अहोरात्र मेहनत घेतं आपल्या सहकाऱ्यांसह मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पाडला सदर सोहळ्याचे निवेदन श्री अशोकजी केसरकर व मंडळाचे उप चिटणीस श्री बबनराव रिकामे यांनी केले. *भरारी घेत असे गगनावरी* *पश्चिम विभाग गवळी समाज आहे लय भारी* अशा अनेक घोषणाबाजी देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट