वाहतूक पोलिसांचे सतर्कमुळे चोरीचे दुचाकी मूळ मालकाचा ताब्यात..

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि १०कल्याण ठाणे

टिळनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन चोरी गेलेली दुचाकी कोळसेवाडी वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार गायकवाड हे वाहतूक नियमन करत असताना लोढा एक्सपेरिया मॉल पासून कोणी कडे जात असताना तीन इसम गाडी क्रमांक MH 05 EF 7970 यांना पकडले. त्या इसमानां पोलीस हवालदार गायकवाड यांनी विचारणा केली असताना त्यांनी त्यांना उडवाउडुचे उत्तर दिले. पोलीस हवालदार गायकवाड यांना शंका आल्याने ते इसम त्या ठिकाणीहुन पळ काढले. पोलीस हवालदार गायकवाड यांनी त्या गाडीचं सविस्तर माहिती काढून मूलमाळक त्यांच्याशी संपर्क केले असता ती गाडी टिळक नगर पोलीस ठाणे मध्ये चोरीचं नोंद असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर त्या मूळ मालकाच्या हातामध्ये ती गाडी सोपवण्यात आली असून त्या मालकांनी त्यांचे कौतुक व वाहतूक शाखेचे धन्यवाद व्यक्त केले.