सामाजिक सलोखा दाखवत दुर्गवाडीमध्ये विकासकामे करणा-यांचे स्वागत करुन आभार मानले…

0
Spread the love

प्रतिनिधी-सुशील तांबे

राजापूर:

   दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी दुर्गवाडी मुंबई मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने वाडीच्या विकासकामांना गती देणा-यासाठी व पुर्णत्वास गेलेल्या कामांना योगदान व सहकार्य देणा-या वाडीतील ग्रामस्थ,कुणबी समाजाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते,राजकीयपटलावरील मान्यवर तसेच कशेळी ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच तसेच सदस्य उपस्थित होते.

सदर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन वाडीच्या विकासकामांना बांधील असल्याची भावना व्यक्त करुन विकासकामांना गती देवु अशी ठोस भुमिका जाहीर केली.

१. कुणबी समाज सुधारक व संस्थापक आदरणीय माळी गुरूजी यांच्या प्रतिमेला पुष्षहार अर्पण करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.

२.वाडीच्या विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक जमिनी दिल्याबद्दल भागवत कुटुंबांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

३.श्रमदानातुन बांधण्यात आलेली स्मशानभुमी व त्यावेळी दाखविण्यात आलेली एकजुट वाखाणण्याजोगी होती.

४.सुशील तांबे यांच्या कल्पनेतुन साकारलेले साई सेवा प्रतिष्ठाणाचा शुभारंभ करण्यात आला.त्यावेळी सुशील तांबे यांनी साईसेवा प्रतिष्ठाबद्दल उद्देश व माहिती दिली.

५.उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन आजच्या कार्यक्रमाची स्तुती केली.

६.आजच्या कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री.महेश भोसले व श्री केतन तांबे यांनी केले.
आजचा कार्यक्रम यशस्वी करणा-यासाठी वाडीप्रमुख,पाच गावकार तसेच ग्रामस्थांचे योगदान महत्वपुर्ण ठरले.

यावेळी प्रमुख मान्यवर श्री मिलिंद भागवत ,दुर्गवाडी प्रमुख श्री गोकुळ भोसले ,कुणबी समाज सेवा मंडळ मुंबई अध्यक्ष श्री. प्रभाकर वारिक ,ग्रुप ग्रामपंचायत कशेळी उपसरपंच श्री. नंदकुमार फोडकर, सदस्य श्री. अनंत फणसे, श्री प्रकाश डुकळे, सौ.दिपाली हळदणकर , मा. शिक्षण सभापती व जिल्हा परिषद सदस्य श्री. दिपक नागले, लक्ष्मी नारायण शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष श्री. वसंत पाटील, दुर्गवाडीचे हितचिंतक व सामाजिक कार्यकर्ते श्री.दिलीप फोडकर, मार्गदर्शक श्री. अनंत सावरे सर्व समाजसेवक,आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते,शिक्षक प्रसारक,यांचे विशेष सहकार्य लाभले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट