शिराळ्यात नूतन आगार व्यवस्थापकांचे प्रवासी संघाकडून स्वागत…
उपसंपादक – रणजित मस्के
सांगली 32 शिराळा : एसटीच्या शिराळा आगाराचे नूतन आगार व्यवस्थापक संजय चव्हाण यांचे शिराळा तालुका प्रवासी संघाच्यावतीने स्वागत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रवासी संघाच्यावतीने चव्हाण यांना प्रवाशांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनामधील मागण्या अशा, आगारातील बहुतांशी जुन्या एसटी बसेस बंद करून, नवीन गाड्यांची तातडीने
खरेदी करावी; मुंबई, पुणे या शहरांमध्ये तालुक्यातील लोक विशेषतः तरुण मोठया प्रमाणात स्थलांतरित झाल्याने या मार्गावर एसटी महामंडळाने सायंकाळची प्रवासी वाहतूक सुरू करावी, तालुक्यातील सर्व मार्गांवर शालेय फेऱ्या नियमित कराव्यात, विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार फेऱ्यांची संख्या वाढवावी, बसस्थानक परिसरात रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाचा बोजवारा उडाला आहे. बसस्थानक परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तरी या परिसराची दयनीय सह्या आहेत.
अवस्था बदलावी; बसस्थानक परिसरात तातडीने डांबरीकरण करावे तसेच सर्व परिसर स्वच्छ करून सुशोभीकरण करावे, एसटी आगारात उपहारगृह नाही, ते तातडीने सुरू करावे. चव्हाण यांनी या मागण्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले. निवेदनावर प्रवासी संघाचे समन्वयक आकाश कांबळे, बंटी नांगरे-पाटील, अमोल पाटील, बाळासाहेब पाटील, अमर पाटील, पिनू पाटील, पृथ्वीराज कांबळे, मारुती रोकडे आदींच्या साह्य आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com