लग्न समारंभात चोरी केलेले २६ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त हिंजवडी पोलीस तपास पथकाची उल्लेखनीय कामगीरी…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे : दि. ०६/१२/२०२२ रोजी आर्थिक हॉटेलमध्ये लग्न समारंभातून कोणीतरी अज्ञात चोरटयाने लग्नातील लोकांची नजर चुकवुन लग्नातील मुलीकडील ६५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व ९०००००/- रोख रक्कम पोरी करून नेल्याबाबत हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ११८५/२०२२ भादवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे. मा. पोलीस उप आयुक्त परि २ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणेबाबत हिंजवडी पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना सुचना दिल्या होत्या.

तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक सागर काटे व राम गोमारे असे तपास पथकातील अंमलदारांसह दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना ऑफ हॉटेलमधील लावण्यात आलेल्या सी.सी.टि.व्हि. फुटेजची बारकाईने पाहणी करीत असताना दोन अनोळखी इसम हे लग्न समारंभात येवुन लोकांची नजर चुकमुन फिर्यादी सांधे आईने सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवलेली पर्स घेवुन जात असताना दिसले. त्यावेळी सदर इसमांबाबत गोपनीय सूत्रांकडून माहिती काढली असता तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना त्यांचे गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, अशाप्रकारे लग्न समारंभात मध्यप्रदेश राजगढ़ जिल्हातील असु शकतात. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, हिंजवडी पोलीस दाणे यांनी सदर ठिकाणी जावून खात्री करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास सांगितली असता वरिष्ठांचे परवानगीने तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक राम गोमारे, पो.हवा ८७३ कैलास कंगले पोहवा. १५८] विक्रम कुदळ, पो.शि. २४०० दत्तात्रय शिंदे व पो.शि. २४०१ ओमप्रकाश कांबळे असे बोडा पोलीस ठाणे जि.राजगढ़ राज्य यप्रदेश येथे जाऊन दिवस वास्तव्य करून, कौशल्याने कसून तपास करून चोरी करणारे इसम है बोडा पोलीस ठाणे हदीतील ग्राम कहीयासांसी छापचौर, जि.राजगढ राज्य मध्यप्रदेश येथील इसम नामे १)रितीक महेश सिसोदिया वय २० वर्षे व २) वरुण राजकुमार सिसोदिया वय २३ वर्षे हे असल्याचे समजले. तेथील विशेष गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरची चोरी ही आरोपी नामे १)रितीक महेश सिसोदिया व २० वर्षे २) वरुण राजकुमार सिसोदिया व २३ वर्ष [4] शालु रंगी धपानी वय २८ वर्ष ४) शाम लक्ष्मीनारायण सिसोदिया व ३८ वर्षे सर्व रा.ग्राम कडीयासी चा. पचोर ठाना बोडा जि. राजगढ़ राज्य मध्यप्रदेश यांनी मिळून केली आहे. तसेच चोरी केलेल्या मालापैकी काही माल हा आरोपी यांचे घरी असलाचे समजले. स्थानिक पोलीसांचे मदतीने वरील चारही आरोपींचा शोध घेतला. परंतु राहते घरी मिळुन आले नाहीत. त्यामुळे स्थानिक पोलीसांचे मदतीने वरील आरोपींचे नातेवाईकांकडे कौशल्याने तपास करून दाखल गुन्हयातील चोरी गेलेल्या सोन्याचे दागिन्यांपैकी २६ लाख रुपये किंमतीचे ५२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे जप्त केले आहेत. दाखल गुन्हयातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर विविध राज्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपींचा व उर्वरीत दागिन्यांचा शोध चालु आहे.

सदरची कारवाई मा.श्री.विनयकुमार पीने पोलीस आयुक्त मा.श्री. मनोज लोहिया सहपोलीस आयुक्त, मा.श्री.संजय शिंदे को, अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी विषय मा.श्री.वी. काकासाहेब डोले पोलीस उपयुक्त परि २ गाविसले राहती आयुक्त, वाक विभाग वाकड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे). सोन्या देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे) उपास पथकाचे प्रमुख सपोनि सागर काटेराम गोमारे निमेशमाशिंदे स कंगले योगेश शिंदे कुणाल शिंदे, बाम अरुण नरके, गडदे, रिवेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालये, सुभाष गुरद, अमर राणे, ओक, दत्ता शिंदे, सागर पंडीत यांनी केली आहे अशी माहीती (डी) पोलीस उप-आयुक्त परि-२. पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड यांच्या कडून प्राप्त झाली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट