वाटपुर येथुन खुन करुन फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण यांचे जाळयात

सह संपादक – रणजित मस्के
अमरावती
पो.स्टे. लोणी येथे दिनांक 12/04/2025 रोजी तक्रारदार सुलोचना सुनील बनसोड वय 39 वर्ष, रा. बाटपुर ता. नांदगांव खंडेश्वर जि. अमरावती यांनी तक्रार दिली कि, दिनांक 11/04/2025 रोजी रात्री 09.30 वा.ते 10.00 वा. दरम्यान तक्रारदार या घरी हजर असतांना त्यांचे पती सुनील ज्ञानदेवराव ऊर्फ जयराम बन्सोड हे घराचे बाहेर बसून असतांना त्यांना आरडा ओरड चा कल्ला आल्याने त्यांनी घराचे बाहुर जावुन पाहीले असता त्यांचे घरासमोरच राहणारा पंकज नंदु कड्डु हा त्यांचे पतीसोबत वाद करीत होता. त्यावरुन तक्रारदार यांचे पतीने त्यास हटकले असता पंकज कडु याने त्याचे घरातुन चाकु आणला व तक्रारदार यांचे पोटात चाकुने मारले तक्रारदार यांनी आरडा ओरड केली असता पंकज कडु हा तेथून पळून गेला तेव्हा गावातील लोकांनी तक्रारदार यांचे पती सुनील ज्ञानदेवराव ऊर्फ जयराम बन्सोड यांना लोणी येथील दवाखाण्यात नेले तेथील डॉक्टरांनी तक्रारदार यांचे पतीला इवॉन हॉस्पीटल अमरावती येथे रेफर केले. वरुन तक्रारदार यांनी अमरावती येथील त्यांचा भाचा यास फोन करुन घडलेली हकीकत सांगुन इवीन हॉस्पीटल अमरावती येथे पाठविले असता भाचा अंकुश जामनीक यांनी तक्रारदार यांना त्यांचे पती मयत झाल्याचे सांगीतले. अशा तक्रारदार यांचे तक्रारीवरुन पो.स्टे.लोणी येथे अप. क्रमांक 104/2025 कलम 103(1),352बी.एन.एस. सहकलम 3(2) (v),3(2) (va),3(1)(s) अ.जा.ज.प्र.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेता मा.पोलीस अधिक्षक श्री. विशाल आनंद सा. अमरावती (ग्रामीण) यांनी सदर गुन्हातील फरार आरोपीचा शोध घेवून त्यास अटक करण्याच्या स्थानिक गुन्हे शाखा अमरावती (ग्रामीण) यांना सुचना निर्गमीत केल्या होत्या.
सदर गुन्हयासंबंधाने समांतर तपास करीत असतांना गुप्त माहीतगाकडुन गोपनीय माहीती मिळाली कि, सदर गुन्हयातील आरोपी पंकज नंदू कडू हा गांधी चौक अमरावती येथे हजर आहे वरुन पो. स्टॉप पो. स्टॉप पो. हवा. 149,1738,2047,1710,1655 चालक प्रज्वल ब.नं.32 यांचे मदतीने सापळा रचून आरोपी पंकज नंदु कड्डु वय 30 वर्ष रा. वाटपुर ता.नांदगांव खंडेश्वर जि. अमरावती यास ताब्यात घेण्यात आले व सदर गुन्हया संबंधाने विचारपुस केली असता आधी उडवाउडवीचे उत्तरे दिली वरुन त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केला असल्याचे सांगुन गुन्हा करुन तेथून पळून गेलो होतो. व अमरावती येथील गांधी चौकात आलो होतो. असे सांगीतले आहे. तरी त्यास पुढील कार्यवाही करीता पो.स्टे.लोणी यांचे कडे सोपविण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. विशाल आनंद सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत सा, यांचे मार्गदर्शणाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती (ग्रामीण) यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले, पो.हे.कॉ. सुनील महात्मे, सैय्यद अजमत, सुधीर बावणे, निलेश डांगोरे, चेतन दुबे,सर जिप चालक पो.हे. कॉ. प्रज्वल राऊत सर्व नेमणूक स्था.गु.शा. अमरावती (ग्रामीण) तसेच पो.स्टे. सायबर अमरावती (ग्रामीण) येथील पो.हे. कॉ. सागर धापड, शिवा शिरसाठ यांनी केली,