वारजे माळवाडी पोलीसानी बाहेर राज्यातून येवून घरफोडी करणारा अटल गुन्हेगारास केले जेरबंद..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

सुमारे आठ दिवसांपूर्वी गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक इसम हा बाहेर राज्यातून येवून पुणे शहर परिसरात घरफोडी करतो. तसेच तो घरफोडी करताना चोरी केलेल्या गाड्याचा वापर करतो. त्या अनुषंगाने वारजे माळवाडी पोलीस ठाणे हद्दीतील विवीध सीसीटिव्ही फुटेजची पडताळणी करीत असताना आज रोजी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते व गणेश शिंदे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर इसम आज कर्वेनगर नागामध्य येणार आहे.

त्या अनुषंगाने पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, व तपास पथकातील पोलीस अंमलदार शिंदे, कुंभार, काटे, जाधव, व शेलार, असे सर्वजण कर्वेनगर भागामध्ये सापळा रचून थांबलो असता एक संशयीत इसम हा त्याचेकडे असलेल्या ACCESS १२५ MH ११ DP ९६०६ हिचे सह संशयीत रित्या थांबलेला दिसून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व्यंकटेश रमेश व्यंकी, वय २२ वर्षे, रा. गांधीनगर, चल्लाकेरे जि. चित्रदुर्ग राज्यकर्नाटक असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे असलेल्या ACCESS १२५ या गाडीच्या डीकीमध्ये पाहिले असता त्यामध्ये एक कटावनी, दोन स्कुड्राव्हर, कटर, पाहाना हे साहित्य मिळून आले. सदर गाडी व साहित्या बाबत त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने सांगितले की, सदरची गाडी ही हडपसर येथून चोरी केली असल्याचे सांगीतले. त्यास ताब्यात घेवुन बी एन एस एस कलम ३५ (१) (३) प्रमाणे अटक करुन त्याचेकडे केले तपासात त्याने लोणीकंद पोलीस ठाणे, बावधन पोलीस ठाणे, आंबेगाव पोलीस ठाणे या भागात घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

नमुद आरोपीकडे मिळून आलेल्या वाहना बाबत हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर २८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंद आहे. तसेच आंबेगाव परिसरामध्ये घरफोडी केलेबाबत आंबेगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ४८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) ३३१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०३ पुणे शहर, श्री. संभाजी कदम, मा. सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग, पुणे शहर श्री. माऊसाहेब पटारे, यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काईंगडे, यांचे देखरेखीत तपास पथकाचे अविकारी पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार वाकसे, कळंबे, चित्ते, शिंदे, पोळ, कुंभार, काटे, तांगडे, कपाटे, जाधव, शेलार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट