वॉर्डन चे तडका फडकी काढले फर्मान

प्रतिनिधी : विश्वनाथ शेनोय
दिनांक : १६ कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी ७५ वाहतूक नियंत्रण वॉर्डन नियुक्ती ६०००/- मानधन अटी शर्तीवर करण्यात आली होती. परंतु हे सर्व वॉर्डन गेले कित्येक वर्षांपासून अंतर्गत बदल्या केल्या गेल्या नसल्याने व त्यांच्या वाढत्या तक्रारी ह्या सतत सहाय्यक पोलीस आयुक्त,कल्याण वाहतूक विभागाकडे प्राप्त होत आहेत. तसेच एका वॉर्डन ने आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण विभागाचे संजय साबळे यांनी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सर्व वॉर्डन यांना शिस्त लागावी व त्यांनी वाहतूक नियमानाचे काम चांगल्या प्रकारे करावे म्हणून त्यांच्या तडका फडकी तात्पुरत्या तैनातीचे आदेश अंतर्गत वाहतूक शाखेमध्ये जारी केले आहे

