तलासरी पोलीस ठाणे यांचेकडून सन २०१९ पासून पाहिजे असलेला आरोपी हत्यारासह अटक…
उपसंपादक – रणजित मस्के
पालघर : आगामी प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी पालघर जिल्हायातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत “ऑल आउट ऑपरेशन” राबविण्याचे आदेश दिले.

त्या अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दत श्री. अजय वसावे, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे यांनी पाहिजे, फरारी आरोपी यांचा शोध घेणेकामी व इतर कारवायांकरीता वेगवेगळी पथके तयार केली. त्यापैकी एका पथकाने डोंगारी पाटीलपाडा भागात पाहिजे आरोपी याचा शोध घेत असताना एक सिल्व्हर रंगाची स्कॉर्पीओ गाडी जाताना दिसून आली. सदर गाडीला हाताने थांबण्याचा इशारा केला असता चालकाने पोलीस असल्याचे पाहून गाडी न थांबवता निघून गेला. त्यामुळे सदर गाडीचा पाठलाग करून गाडीला थांबवून आतमधील चालकास विचारपुस केली असता त्याने आपले नाव पनज्या उर्फ बन्सी बनश्या बोंड वय ३४ वर्षे, रा. डाँगारी पाटीलपाडा, ता. तलासरी, जि. पालघर असे सांगितले. नमुद इसम हा तलासरी पोलीस ठाणे गु.रं.नं. १९३/२०१९ ‘भा.द.वि.सं. कलम ३५३, ३३२, २४७, ५०४, ५०६, ३४ मधील पाहिजे आरोपी असून तो २०१९ पासून फरार आहे. नमुद आरोपीची व गाडीची झडती घेतली असता एक पिस्टल त्याचे मॅग्झीनमध्ये दोन जिवंत राउंड, एक बनावटी लोखंडी पिस्टल व पाच मोबाईल असा एकूण १२,३२,७००/- रुपयेचा मुद्देमाल (गाडीसह ) जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी हि श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे आदेशान्वये श्री संजीव पिंपळे, उप विभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अजय बसावे, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे, पोउपनि / भाऊ गायकवाड, पोहवा/घाटाळ, पोहवा/पाटील, पोहवा / भोसले नेमणूक तलासरी पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com