वाडा पोलीस ठाणे हद्दीतील मेटा फिल्ट प्रा. लि. कंपनीत दरोडा टाकणाऱ्या ५ आरोपींना पकडण्यात वाडा पोलीस ठाणे यांना मोठे यश..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पालघर :-

दिनांक २१/०८/२०२३ रोजी वाडा पोलीस ठाणे हद्दीतील मेट गावी असलेल्या मेटा फिल्ड प्रा.लि. बंद कंपनीमध्ये काही इसम हे कंपनीच्या आतमध्ये चोरी करण्याचे उद्देशाने घुसल्याची बातमी श्री. प्रदिप गिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी तात्काळ सदर माहिती ही श्री. शैलेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग व श्री. सुरेश कदम, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे यांना दिली.

श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये श्री. शैलेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग व श्री. सुरेश कदम, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली नमूद बंद पडलेल्या कंपनीच्या घटनास्थळी दुपारी १५.४५ वाजताचे सुमारास सपोनि / प्रदिप गिते, पोउनि / संतोष वाकचौरे, पोहवा / ३६९आर. एस. गवळी, पोहवा / ६०५जी. जी. सोनावणे, पोशि/ सोनावणे, पोशि/ घुगे, पोशि/ वाघचौरे, पोशि/जनाते यांचे पथक तयार करून रवाना केले. सदर पथक कारवाई करणे कामी नमूद घटनास्थळी पोहचले असता त्याठिकाणी असलेल्या चोरांनी पोलीसांना पाहताच पळ काढला. त्यांचा सदर पथकाने पाठलाग केला असता त्यांनी पोलीसांवर दगडफेक केल्याने त्यामध्ये पोशि/ बाबासाहेब घुगे व पोशि/ चेतन सोनावणे हे जखमी झाले. परंतू पोलीसांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. शेवटी त्यांचेपैकी दोन इसमांनी नदीत उडी मारून नदी पार करून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोशि/ चेतन सोनावणे व स्थानिक ग्रामस्थ यांनी नदीत उडी मारून त्या दोन चोरांना पकडून एका एकाला पाण्यातून बाहेर काढले. पळालेल्या इसमांपैकी ०५ इसमांना पकडण्यात पोलीसांना यश आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे
०१) रवाब चरकुल्ला शहा, वय ६० वर्षे, रा. धानिवबाग, बाबाभाई यांची चाळ, ता. वसई जि. पालघर मूळ रा. पटेलाबाजार थाना खेबूरवा, ता. इटावा जि. सिध्दार्थनगर, राज्य उत्तरप्रदेश
०२) मेराज नुरमोहम्मद शहा, वय २१ वर्षे, रा. नवजीवन छुटटन ऑटो गॅरेज ता. वसई जि. पालघर, मूळ रा. उतरोल्ला राजाबाजार ता. जि. बलरामपूर राज्य उत्तरप्रदेश
०३) वैभव रविंद्र जाधव, वय २४ वर्षे, रा. मालबीडी जाधवनगर, पो. दुगाड ता. भिवंडी जि. ठाणे
०४) अब्दुल कलाम सम्मीउल्ला खान, वय ३८ वर्षे, रा. ओनोटापाडा, पेल्हार ता. वसई जि. पालघर, मूळ रा. दौलतपूर पो. दौराचीकी ता. छबीया सौमीनारायण जि.गोंडा राज्य उत्तरप्रदेश
०५) चिराग अरुण पाटील, वय २२ वर्षे, रा. चिंतामणी मंदिराचे समोर, चिंचघर, पो. कुडूस ता. वाडा जि. पालघर

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट