व्याजाचा तगादा लावत दमदाटी करणाऱ्या सावकारांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Spread the love

सोलापूर(बार्शी) येथील शिक्षक श्री.विश्वास बलभिम जाधवर यानी 1) नंदकुमार शिंदे 2) गोंविद शिंदे 3)पप्पु धनाजी उकीरंडे 4)विजय शंकर झिने सर्व ( रहा.बाभुळगाव, ता.बार्शी) व 5) नारायण खापे रहा.तेरखेडा ,ता.वाशी आणि 6) केशव नारायण मोराळे या खासगी सावकारांकडुन घेतलेल्या कर्जाची मुद्दल व व्याजाचे पैसे परत न दिल्याच्या कारणावरून मागील १५ दिवसापासुन वांरवार फोन करून,पैशासाठी तगादा लावुन घरी येवुन दमदाटी व शिवीगाळी करून चेक घेवुन जावुन फिर्यादीस मानसीक त्रास दिल्या प्रकरणी 6 सावकारांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

जाधवर यानी खाजगी कौंटुबिक गरजेसाठी व आर्थिक अडचणीसाठी सुमारे 3 वर्षापुर्वी नंदकुमार शिंदे याचेकडुन 2 लाख रूपये दरमहा 5 % व्याजाने घेतले होते. त्यावेळी सेक्युरीटी म्हणुन कोरा चेक सही करुन दिला होता.परंतु नंदकुमार यांचे कर्जाची मुद्दल, व्याज देणे शक्य नसल्याने फिर्यादीने सुमारे दिड वर्षापुर्वी गोंविद शिंदे याचेकडुन 1 लाख 50 हजार रूपये दरमहा ६ % व्याजाने व पप्पु धनाजी उकीरंडे यांचेकडुन 2 लाख रूपये दरमहा ४ %व्याजाने घेतले होते.

परंतु या सावकारी कर्जाची मुद्दल व व्याज वाढत गेल्याने पुन्हा 1 वर्षापुर्वी विजय झिने याचेकडुन 50 हजार रूपये दरमहा ५ % व्याजाने घेतले तर नारायण खापे याचेकडुन 40 हजार रूपये दरमहा ७ % व्याजाने घेतल्याने सदर कर्जाचे व्याज सावकाराकडे दिले त्यानंतर मागील 10 महिन्यापुर्वी केशव मोराळे याचेकडुन 40 हजार रूपये दरमहा १० % व्याजाने सावकारी कर्ज घेतले होते.

परंतु गेल्या 3 वर्षापासुन आर्थिक अडचणीमुळे वेळोवेळी संबंधीत सावकाराकडुन कर्ज घेवुन त्याचे व्याज सावकाराकडे देत होते. परंतु सर्व सावकारांचे कर्ज जास्त झाल्याने फिर्यादी जाधवर याना व्याज भरणे शक्य होत नसल्याने मागील 2 महीन्यापासुन कर्जाचे व्याज देणे बंद केले होते. परंतु आपल्या सावकारी कर्जाचे व्याज देत नाही म्हणून पप्पु धनाजी उकीरंडे याने सुमारे 15 दिवसापुर्व घरी येवुन दमदाटी करून कर्जाचे व्याज म्हणुन ८० हजार रूपयेचा चेक घेवुन गेला होता.

तसेचदि. २ नोव्हेंबर 2021रोजी ६० हजार रू चा चेक नातेवाईक सुनिल महादेव नेटके याचेकडे देण्यास सांगितला होता. जाधवर यानी पप्पु उकीरंडे यास पैसे देवुनही फिर्यादीस दि. १४ नोव्हेंबर 2021 रोजी वांरवार फोन करून दमदाटी करून आणखीण व्याजाचे पैशाची मागणी केली होती.

तसेच केशव मोराळे यांने कर्ज व व्याजाची वसुली करणेसाठी दि.१० नोव्हेंबर 2021 रोजी फिर्यादी जाधवर याच्या घरी येवुन घरातील लोकाना मारहाण व त्याची बदनामी करण्याची धमकी देवुन जाधवर याचेकडुन 1 लाख रू रक्कमेचा चेक घेवुन गेला आहे.तसेच नंदकुमार शिंदे यांनी यापुर्वी माझेकडुन तारण म्हणुन एक कोरा चेक सही करून घेतलेला असुन शिंदे यानी त्याचे मोबाईल वरून मला वांरवार फोन करून ” घेतलेले कर्जाचे मुददल व व्याज दिले नाहीतर आम्ही तुला मारून टाकु , शाळेमधुन पैसे वसुल करू, तुझ काय हिशोब आहे तो आम्ही येत्या सोमवारी बघु “अशी दमदाटी केली होती.


तसेच नारायण खापे यानी फिर्यादी जाधवर यांच्या मोबाईलवर फोन करून” पैसे नाही दिले तर मारून टाकण्याची धमकी दिली होती.”व पैशावरुन विजय झिने तसेच गोविंद शिंदे यांनीही धमकी दिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे .अधिक तपास शहर पोलीस ठाणे करित आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

                                                                              

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट