विट्याच्या एम. डी. ड्रग्ज गुन्हयातील तयार माल विकत घेणारे २ आरोपीपोलीस स्टेशन विटा कडूनअटक

सह संपादक- रणजित मस्के
सांगली ;


गुन्हा रजि नंबर व कलम
५२/२०२५ एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क) २१ (क), २९ गु.दा.ता.वेळ
गु.घ.ता.वेळ व ठिकाण
दि. २७.०१.२०२५ रोजी १९.४५ वा. दरम्यान रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज, विटा एम.आय.डी.सी एरीया मध्ये कार्ये
दि. २८.०१.२०२५
फिर्यादी नाव
सागर गिरीजापती टिंगरे, पोहेकॉ / ७१२, नेमणुक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.
माहिती कशी प्राप्त झाली
पोना / संदिप नलावडे, पोहेकॉ सागर टिंगरे पोहेकों / नागेश खरात पोहेकों / अनिल कोळेकर.
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक, रितु खोखर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, स्था.गु.अ. शाखा, सांगली, सपोनि पंकज पवार, स्था.गु.अ. शाखा, सांगली, पोहवा / सागर टिंगरे, अनिल कोळेकर, नागेश खरात, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, दरीबा बंडगर, सागर लवटे, इम्रान मुल्ला, नागेश कांबळे, अमर नरळे, सतिश माने, महादेव नागणे, पोना/ संदीप नलवडे, उदय माळी, पोकों/ विक्रम खोत, सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर
आरोपीची नावः-१) रहुदिप धानजी बोरिचा, यय ४१ वर्ष, रा. श्री रेसेडेन्सी, ररुम नं २२, उत्तीयादरा कोसंबा, ता.
भरुच, जि. सुरत राज्य गुजरात
२) सुलेमान जोहर शेख, वय ३२ वर्ष, रा. मौलाना दादा लेन, दर्गाह गल्ली, बांद्रा, वेस्ट मुंबई)
३) बलराज अमर कातारी, वय २४ वर्ष, रा. साळशिंगे रोड, आयटीआय कॉलेज जवळ, विटा
४) जितेंद्र शरद परमार, वय ४१ वर्षे, रा सुमंगल सोसायटी, बी विंग, फ्लॅट नं. २४.
पहिला मजला, नागडोंगरी चेंडरे, ता अलिबाग, जि रायगड, सध्या रा रहेजा हॉस्पीटल जवळ, ताहिर बेकरीच्या वर, माहिम १६. मुंबई.
५) अब्दुलरज्जाक अब्दुलकादर शेख, वय ५३ वर्षे, रा रूम नं. १. उस्मानिया मस्दिचे बाजूला, अल मोहमदिया वेलफेअर असोसिएशन, पाठणवाडी, फिल्डर पाडा, पवई मुंबई.
) सरदार उत्तम पाटील, वय ३४ वर्षे, रा शेणे, ता वाळवा, जि सांगली. ६
७) सौ. गोकुळा विठ्ठल पाटील, वय ४७ वर्षे, रा. भवानी मळा, पाटील वस्ती, विटा ता. खानापुर, जि. सांगली.
८) मोहम्मद कय्युम अकबर अली शेख, वय ३६ वर्षे, रा. कुर्ला कमान, काजु पाडा, रुम नं. ९ आझाद चाळ, मुंबई.
९) मोहम्मद इस्माईल सलीम खान, वय ४५ वर्षे, रा. कलीना डोंगर रुम नं. ६ शेडी हाजी चाळ, नुरी मस्जीदच्या समोर, सातांक्रूझ, (प्र) मुंबई.
विटा पोलीस ठाणे हद्दीत मेफॉड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ रामकृष्ण हरि माऊली इंडस्ट्रिज, एम.आय.डी.सी. कार्वे येथे टोलीत, प्रॉपीलीन क्लोराईड, अॅल्युमिनियम क्लोराईड, हायड्रोक्लोरीक अॅसिड, क्लोरोफॉर्म, लिक्वीड ब्रोमाईन, मोनो मिथील अॅमाईन हे सर्व केमिकल व साहित्याचा वापर करून आरोपी नं. २ व ३ यांनी संगणमत करून एकूण किंमत २९,७३,५६,२००/-रू (एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख छप्पन्न हजार दोनशे रूपये) चा मेफॉड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ तयार केला होता तो जप्त करून सदर बाबत विटा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा सांगली यांचेकडे देवून सदर गुन्हयाचा सखोल तपास करून सदर गुन्हयातील सर्व साखळी उघडकीस आणुन सर्व आरोपी अटक करणेबाबत आदेशित केले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा सांगली गुन्हयातील अटक आरोपी क्र. ४ ते ५ यांचेकडे सखोल तपास केला असता, नमुद आरोपीतांनी तयार केलेला सदरचा मुद्देमाल हा आरोपी क्र ८ व ९ यांना तयार माल विक्री करीत असलेबाबत तपासात निष्पन्न झाले होते. सदर आरोपी क्र. ८ व ९ यांचा शोध घेणेकरीता स्था. गु. अ. शाखेकडील एक पथक तयार केले होते. सदर पथकाने ३ ते ४ वेळा मुंबई येथे जावून माहिती घेतली परंतु सदरचे आरोपी हे पोलीसांना गुगांरा देत असल्याने मिळून येत नव्हते.
पोनि. सतिश शिंदे व त्यांचे पथकास तांत्रिक माहितीचे विश्लेषण व गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, सदरचे दोन्ही आरोपी हे मुंबईतील वाकोला पोलीस ठाणेचे हद्दीत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे नमुद पथकाने वाकोला मुंबई येथे जावून सापळा रचला असता, नमुद गुन्हयात आरोपी नं. ८ ते ९ हे मिळून आल्याने सदर आरोपीतांना तपासकामी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सांगली येथे आणून त्यांचेकडे सदर गुन्हयाच्या अनुशंगाने तपास केला असता, त्यांचा सदर गुन्हयातील सहभाग निश्चीत झाल्याने त्यांना दाखल गुन्हयाचे कामी अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता, त्यांना ४ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मा. न्यायालयाने मंजुर केले आहे.
तरी सदरचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली हे करीत आहेत.