विटा पोलीसानी हद्दीतील विशाल पाटील टोळी केली हद्दपार…!

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-विटा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार विशाल पाटील टोळीस मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरिता हद्दपार आदेश पारीत केला आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडुन काढुन त्यांचे समुळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभुमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.

विटा पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख अ. नं. १) विशाल प्रशांत पाटील, वय २४ वर्षे, रा. शाहुनगर, विटा ता. खानापुर, जि. सांगली.
२) अमरजित अनिल क्षिरसागर, वय २२ वर्षे, रा. पाटील वस्ती, विटा. ता. खानापुर जि. सांगली
३) अमृत राजेंद्र काळोखे, वय २४ वर्षे, रा. विवेकानंदनगर, विटा, ता. खानापूर, जि. सांगली
४) शुभम महेश कोळी, वय २५ वर्षे, रा. कदमवाडा, विटा, ता. खानापूर, जि. सांगली
५) किसन राजेंद्र काळोखे, वय ३० वर्षे, रा. विवेकानंदनगर, विटा, ता. खानापुर, जि. सांगली.
६) विजय राजेंद्र काळोखे, वय २४ वर्षे, रा. विवेकानंदनगर, विटा, ता. खानापुर, जि. सांगली
७) सागर देवेंद्र गायन वर्षे, रा. विवेकानंदनगर, विटा, ता. खानापुर, जि. सांगली या टोळीविरुद्ध सन मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून खुन, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर बिगरपरवान 1/2
जवळ बाळगुन दहशत माजवणे, गैरकायदयाची मंडळी जमवून इच्छापूर्वक दुखापत पोहचवणे, अपहरण करून इच्छापुर्वक दुखापत करणे, बांधकामास लागणारे साहित्याची तसेच मोटारसायकल व इतर चोरी करणे असे गुन्हे दाखल आहेत. नमुद सामनेवाले हे कायदा न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये प्रभारी अधिकारी विटा पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.

पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन, चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, विटा विभाग, विटा यांचेकडे चौकशी कामी पाठविला. त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सयस्थितीचा अहवाल, त्यांचेवरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन, मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्यांचा व्यापक विचार करुन टोळी प्रमुख अ. नं.
१) विशाल प्रशांत पाटील, वय २४ वर्षे, रा. शाहुनगर, विटा, ता. खानापुर, जि. सांगली.
२) अमरजित अनिल क्षिरसागर, वय २२ वर्षे, रा. पाटील वस्ती, विटा. ता. खानापुर जि. सांगली
३) अमृत राजेंद्र काळोखे, वय २४ वर्षे, रा. विवेकानंदनगर, विटा, ता. खानापूर, जि.सांगली
४) शुभम महेश कोळी, वय २५ वर्षे, रा. कदमवाडा, विटा, ता. खानापूर, जि. सांगली
५) किसन राजेंद्र काळोखे, वय ३० वर्षे, रा. विवेकानंदनगर, विटा, ता. खानापुर, जि. सांगली.
६) विजय राजेंद्र काळोखे, वय २४ वर्षे, रा. विवेकानंदनगर, विटा, ता. खानापुर, जि. सांगली
७) सागर देवेंद्र गायकवाड, वय २७ वर्षे, रा. विवेकानंदनगर, विटा, ता. खानापुर, जि. सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे. टोळीने गुन्हे करणा-या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवुन त्या नेस्तनाबूत करण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई यापुढेही करण्यात येणार आहे.

सदर कारवाईमध्ये मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सतीश शिंदे, स्थागुअ शाखा सांगली, शरद मेमाणे, पोलीस निरीक्षक, विटा पोलीस ठाणे, पोहेकों अमोल ऐदाळे, पोहेकों / अमर नरळे, पोकों/ दिपक गट्टे, स्था. गु. अ. शाखा सांगली, तसेच पोहेकों / विलास मोहिते, पोकों/ वैभव कोळी विटा पोलीस ठाणे यांनी भाग घेतला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट