लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिने पालघर पोलीसांतर्फे व्हिजिबल पाॅलीसिंग व रुट मार्चचे आयोजन..

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर :– पालघर रेल्वे पोलीस ठाणे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या व येणाऱ्या होळी व धुळीवंदन सणाच्या अनुषंगाने व सुरक्षितेच्या दृष्टीने पालघर रेल्वे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात व्हिजिबल पॉलिसिंग व रूट मार्च आयोजित केले होते.

होळी व धुळीवंदन ,आगामी होणा-या लोकसभा निवडणुका अनुषंगाने सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर तसेच community policing च्या अनुषंगाने दक्ष व सतर्क राहणे बाबत, मा. पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई व मा.पोलीस उपयुक्त पश्चिम परिमंडळ लोहमार्ग मुंबई यांच्या सूचनांनुसार दिनांक 19/03/2024 रोजी पालघर रेल्वे पो.ठाणे कार्यक्षेत्रातील पालघर रेल्वे स्टेशन येथे रूट मार्च काढण्यात आले होते.

सदर रूट मार्च दरम्यान पालघर रेल्वे स्टेशन येथील सर्व फलाट, ब्रिज,स्टेशन व स्टेशन बाहेरील परिसर,बुकिंग हॉल,मेन गेट येथे शिस्तबद्ध रूट मार्च संचलन करून रेल्वे प्रवाशांमध्ये सुरक्षेची तसेच पोलीस सतर्क व दक्ष असले बाबतची भावना निर्माण करून रूट मार्च संचलन यशस्वी केले. सदर रूट मार्च मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत रूट मार्च आयोजित करण्यात आला. सदर वेळी स्वतः, वपोनि.इंगवले,02 पोलीस उपनिरीक्षक,09 पोलीस अंमलदार ,23 होमगार्ड अंमलदार हजर होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट