एकच वेळी ३५ लेखकांची २८ पुस्तके प्रकाशनाचा विश्वविक्रम…

उपसंपादक-उमेद सुतार
पुणे ;
पुस्तक लिखाणातून आपली आर्थिक प्रगती साध्य – डॉ. एकनाथ खेडेकर
श्रोत्यांपासून ते वक्तापर्यंतचा प्रवास प्रत्येकाने करावा – स्नेहलता नरवणे
बिग्रो सक्सेस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड च्या मार्गदर्शनातून ३५ लेखक आणि २८ पुस्तके एकच वेळी प्रकाशित करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड पिंपरी-चिंचवड येथील एल्प्रो स्क्वेअर मॉल येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. सदरील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी उत्पादन शुल्क अधीक्षक कोल्हापूरचे स्नेहलता नरवणे, कुतवळ फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन प्रकाश शेठ कुतवळ, विंग्स पब्लिकेशनचे डायरेक्टर दीपक परबत, माजी डीआरडीओ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर, मा. कार्यकारी अभियंते रामदास जगताप, विशेष न्याय दंडाधिकारी अहिल्यानगरचे भास्कर भोस, चेअरमन विलासराव देशमुख लॉ कॉलेजचे वीरूपक्ष अंकलकोटे, ईशवेद बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक संजय वायाळ पाटील, पाटील ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर संजय पत्रा, रिच्युअल सायन्स अँड सायकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट च्या मनिका सिंह, गो गल्फ कन्सल्टन्सीचे कैलास पिंजाणी, माजी कुलगुरू अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी डॉ. एकनाथराव खेडकर आणि बिग्रो सक्सेस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक दादा भापकर आणि मोहसिन पठाण, बिग्रोची सर्व टीम आणि सदस्य उपस्थित होते.
बिग्रो ही फायनान्शिअल आणि बिझनेस ग्रोथ करण्यासाठी मार्गदर्शन करणारी संस्था आहे. या संस्थेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या स्ट्रॅटेजींच्या वापर करून आतापर्यंत भरपूर जणांनी फायनान्शिअल ग्रोथ केलेली आहे, त्यांचे उत्पन्न-व्यवसाय पटींमध्ये वाढवलेला आहे. आपल्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी पुस्तक लिहिणे ही सुद्धा एक खूप फायदेशीर स्ट्रॅटेजी आहे आणि म्हणूनच बिग्रो ही संस्था बिझनेस वाढीसाठी पुस्तक लिहिण्यासाठी उद्योजकांना प्रेरित करते आणि त्यांना पुस्तक लिहिण्यासाठी मार्गदर्शनही करते.