विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज सेंटर लोकार्पण सोहळा करिता वाहतुकीत बदल
कल्याण ठाणे
प्रतिनिधी- विश्वनाथ शेनोय
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेय्या कार्यक्षेत्रातील कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे हद्दीन दि. १३/०४/२०२५ रोजी सायंकाळी १९:३० वा. कल्याण पुर्व “ड” प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे परिवेशत विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज सेंटर लोकार्पण सोहळा आयाजित करण्यात आलेला आहे. तसेच दिनांक १४/०४/२०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आआंबेडकर जयंती च्या अनुषंगाने मिरवणुका निघणार असुन सदर मिरवणुका जुना पुना लिंकरोड वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक “ड” वॉर्ड, कल्याण डोंबिवली मनपा कार्यालय, कल्याण पुर्व येथे समाप्त होणार आहेत. त्यामुळे सदर परिसरात वाहतूक कोडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहणे सामान्य जनतेच्या सोईसाठी आवश्यक आहे.
पंकज शिरसाट, पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर महाराष्ट्र शासन गृहविभाग क्र. एम.की.ए.-११६/सीआर/३७/टीआर, दि. २७/०९/१९९६ वे अधिसुचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (अ) (य) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी पुढीलप्रमाणे अधिसूचना जारी केला आहे.
नो पार्कोंग झोन
कल्याण पूर्व ‘ड’ वॉर्ड समोर जुना पुणा लिंक रोडवर रस्त्याचे दुतर्फा दोन्हीही बाजुस ५०० मीटर पर्यंत नो पार्कीग झोन करण्यात येत आहे.
नो पार्कीग पुना लिंक रोड वरून नूतन ज्ञानमंदीर शाळेकडे जाणान्या रस्त्याचे दुतर्फा ३०० मीटर पर्यंत नो पार्कीग झोन करण्यात येत आहे.
नो पार्कीग पुना लिंक रोडवरून राय रेसिडेन्सी ऑफिस कडे जाणान्या रस्त्याचे दुतर्फा ३०० मीटर पर्यंत नो पार्कोग झोन करण्यात येत आहे.
सदर अधिसूचना दि. १३/०४/२०२५ रोजी रात्रौ ००:०१ ते दिनांक १४/०४/२०२५ रोजी रात्रौ २४.०० वाजेपापेतो अंमलात ग्रहोल.
सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, प्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.