विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे पोलीस मिशन परिवर्तन उपक्रमाचे आयोजन

सह संपादक- रणजित मस्के
पुणे
मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेशकुमार, व कला क्रिडा साहीत्य शांतीदुत परीवार यांचे संयुक्त संकल्पनेतून पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील विधीसंघर्षग्रस्त बालक व बेरोजगार मुले यांना रोजगाराची व सुधारण्याची संधी उपलब्ध व्हावी या करीता “पुणे पोलीस मिशन परिवर्तन” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उपक्रमांतर्गत दिनांक २१/०३/२०२५ रोजी दुपारी १२.०० ते १५.०० या वेळेत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे विधीसंघर्षीत बालक व गुन्हेगारी क्षेत्राकडे वळालेल्या मुलांना गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करुन त्यांचेकरीता कौशल्य विकास व रोजगार प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण शिबीरामध्ये एकुण ५५ मुलांनी उत्सपूर्त पणे सहभाग घेतला.
प्रशिक्षणाकरीता कला क्रिडा साहीत्य शांतीदुत परीवाराचे अध्यक्ष श्री योगेश जाधव व सचिव तथा प्रशिक्षीका श्रीमती अनिता राठोड हे हजर होते. त्यांनी मुलांना ‘स्वीट बॉक्स’ कसे बनवायचे या बाबत प्रशिक्षण दिले. त्यांनतर उपस्थित सर्व मुलांनी अतिशय छान पद्धतीने स्वीट बॉक्स बनविले. प्रशिक्षण शिबीरा दरम्यान मुलांचे चेह-यावरील भाव पाहून सदरची मुले नक्कीच गुन्हेगारी क्षेत्रापासून दूर राहतील असा विश्वास त्यांचे चेह-यावर दिसत होता. काही मुलांनी कार्यक्रमानंतर आम्हाला या पुढेही अशा प्रशिक्षण शिबीरामध्ये भाग घेण्यास आवडेल असे बोलून दाखविले. कला क्रिडा साहीत्य शांतीदूत परीवाराचे अध्यक्ष श्री योगेश जाधव व सचिव तथा प्रशिक्षीका श्रीमती अनिता राठोड यांनी सदर मुलांना वरचेवर भेटी देऊन त्यांचेकडून स्वीट बॉक्स बनवून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.
सदर प्रशिक्षण शिबीर हे मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेशकुमार, मा. पोलास सह आयुक्त पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग
पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, श्री हिंमत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे श्री विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे श्रीमती कांचन जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी श्री नितीन राठोड, व तपास पथकाचे अंमलदार यांनी उत्कृष्ठ रित्या पाडले आहे.