विश्रामबाग पोलीसांनीदिवसा घरफोडी करणारा आंतरराज्य चोरटयास केले जेरबंद..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-अपराध क्र आणि कलम
विश्रामबाग पोलीस ठाणे, सांगली
१) विश्रामबाग पोलीस ठाणे, गुन्हा रजि. नंबर २८५/२०२४ बी.एन.एस. कलम ३३१(३), ३०५
दतात्रय संपतराव पाटील, वय ४४ वर्षे, व्यवसाय स्फुर्ती चौक विश्रामबाग सांगली
गु.घ.ता वेळ
माहिती कशी प्राप्त झाली
दि.१३/०८/२०२४ रोजी सकाळी १०.३० या ते दुपारी ०२.३० वा.
दि. १३.०८.२०२४ रोजी
फिर्यादी नाव
पोहेकी/१८८१ सागर लवटे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी मा. श्री संदिप घुगे पोलीस अधिक्षक सांगली मा. रितु खोखर अपर पोलीस अधिक्षक सांगली मा. विमला एम. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली याचे मार्गदर्शानाखाली स्था गु. अ. शाखा सांगली कडील १) मा. पोलीस निरीक्षक सतीश शिंदे २) सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत, ३) सहा पोलीस निरीक्षक/पंकज पवार ४) पोहेकों/सागर लवटे ५) पोहेकों/दरिबा बंडगर ६) पोहेकॉ सतीश माने ७) अनिल रैनापुरे ८) पोना/ संदीप नलवडे, ९) पोना/सोमनाथ गुंडे १०) पोकों/ विनायक सुतार
विश्रामबाग पोलीस ठाणे कडीलः १) पोलीस निरीक्षक प्रविण कुमार कांबळे २) पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार, ३) पोहेकों/ बिरोबा नरळे, ४) पोकों / महमद मुलाणी ५) पोकों/ प्रशांत माळी ६) पोकों/सुनील पाटील १२) सायबर पोलीस ठाणे कॅप्टन गुंडवाडे यांनी कारवाई केलेली आहे.

अटक दिनांक
दिनांक २८/०९/२०२४ रोजी आरोपीचे नाव पत्ता
१) सॅमसन कल्याण पश्चिम जि. ठाणे, १) १,२५,०००/- रू. किंमतीची एक अडीच तोळे वजनाचे सोन्याचा नेकलेस जु.वा.कि.अ.
रुबीन डॅनीअल, यय २५ वर्षे, रा. बेतुरकर पाडा क्यालीटी कंपनी डॅनियल हाऊस, रुम नं. ०५
जप्त मुद्देमाल
२) १,२५,०००/- रू. किंमतीची एक अडीच तोळे वजनाचे सोन्याचा गंठण जु.वा. किं.अं. ३) १.२५,०००/- रू. किंमतीची एक अडीच तोळे वजनाचे सोन्याचा लक्ष्मी हार जु.वा.किं.अं. ४) ७५,०००/- रू. किंमतीची प्रत्येकी अर्धा तोळे वजनाच्या सोन्याच्या तीन आंगठ्या. एकुण ४,५०,०००/- रू. (चार लाख पन्नास हजार रूपये मात्र)
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने मा श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली व मा. रितु खोखर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे च स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडीचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करुन घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्था गु अ शाखा यांनी स्थानिक गुन्हे
अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशियत इसमांची माहिती काढून त्याचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोहेकॉ सागर लवटे यांना त्यांचे बातमीदारांकडुन इसम नामे सॅमसन रुबीन डॅनीअल, वय २५ वर्षे, रा. बेतुरकर पाडा क्वालीटी कंपनी डॅनियल हाऊस, रुम नं. ०५ कल्याण पश्चिम जि. ठाणे यांने सदरचा गुन्हा केल्याची व हा आरोपी सुरत (गुजरात) येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्था. गु. अ. शाखेडील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्याचेकडील पथक लागलीच रवाना होवुन सदर आरोपीस सुरत (गुजरात) येथुन ताब्यात घेवुन गुन्हयाचे पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे रिपोर्टासह दि. २८/०९/२०२४ रोजी हजर केले व कायदेशीर अटक केले.
त्यानंतर सदर इसमास यातील तपासी अधिकारी पोउपनि स्वप्नील पोवार यांनी मा. न्यायालयात हजर केलेनंतर मा. न्यायालयाकडुन आरोपीत याची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर झालेनंतर विश्रामबाग पोलीस ठाणे कडील व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील संयुक्त पथकाने सदर आरोपी इसम सॅमसन डॅनियल यास विश्वासात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी केलेनंतर आरोपीत याने चोरी केलेला मुददेमाल वांगणी जि. ठाणे येथे दिलेला असल्याबाबत माहीती मिळाल्यानंतर मा. वरीष्ठांची परवानगी घेऊन मा पोलीस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे विश्रामबाग पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयाचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार यांचे सोबत पोहेकी / बिरोबा नरळे, पोहेकॉ दरिया बंडगर, पोना/ संदिप नलावडे, पोकों / महमद मुलाणी व पोकों/ सुनील पाटील यांचे पथकाने वांगणी जि. ठाणे येथे जाऊन वरील मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी कल्याण, रत्नागिरी, जळगाव, सुरत (गुजरात), व खंडवा (मध्य प्रदेश) अशा ठिकाणी गुन्हे दाखल असलेबाबत माहिती मिळालेली आहे.
सदरचा आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असुन सदर गुन्हाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com