विसरलेली बॅग मध्य रेल्वेचे तिकीट निरीक्षकांनी प्रवासीचें केली स्वाधीन

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि २६ डोंबिवली ठाणे

मध्य रेल्वे ठाकुरली दि २६ रोजी दुपारी २.३५ वा ऐन्सी सुबीन नावाची एक महिला धावत धावत ठाकुर्ली टीसी कार्यालयात आली. त्या महिलेचे Apple कंपनीचा लॅपटॉप, मोबाईल व ऑफिसचे काही महत्वाचे कागदपत्रे असलेली बॅग लोकल ट्रेनमध्ये विसरली माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता ठाकुर्लीचे मुख्य तिकीट निरीक्षक गीतेश सोंडे यांनी तत्काळ कल्याण टीसी कार्यालयाशी संपर्क साधला असताना कल्याणचा स्टाफ स्टेशनवर पोहोचण्या अगोदर लोकल निघून गेली.त्यानंतर गीतेश यांनी अनाउन्सरशी संपर्क साधून कल्याण वरून मुंबईला जाणारी लोकलची माहिती घेऊन ती लोकल ठाकुर्ली प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आली, त्यांनी धाडसाने लोकलमध्ये जाऊन ती बॅग मिळवली व ती बॅक टिसी कार्यालयात आणून त्या महिला व तिच्या आई स्वाधिन केले. मौल्यवान असलेली बॅग मिळाल्यानंतर त्या महिला व तिच्या आईने मध्य रेल्वे प्रशासन व ठाकुर्ली टिसी कार्यालयामध्ये असलेले वरिष्ठ तिकीट निरीक्षक प्रज्ञा कुलकर्णी, मनोज चौधरी आणि गीतेश सोंडे या सर्वांचे आभार व्यक्त करून त्यांचे कौतुक केले