रायगडमध्ये होतोय निवडणूक आचारसंहितेचा भंग…

0
Spread the love

प्रतिनिधी – सचिन पवार

माणगांव :- रायगड,:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे टोलफ्री संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.किशन जावळे यांनी दिली आहे मात्र राष्टवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्क महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचा बॅनर माणगांव नगरपंचायत प्रभाग क्र. 6 मध्ये सुशोभिकरण करणे नितीश अपार्टमेंट येथे पेव्हर ब्लॉक बसविणे विदयानगर गणेश विसर्जन घाट दुरुस्ती व सुशोभिकरण करणे अशा अनेक घटनाचा बॅनर वाईज माणगांव शहरात गल्ली बोलात सगळीकडे सोशल मीडियाद्वारे पब्लिश होत आहे .

माणगांव तालुक्यातील कचेरी रोड येथील असलेल्या विद्या नगर या ठिकाणी 15 लाख तर माणगांव नगरपंचायत हद्दीतील विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पूरविणे करिता 1. 75 कोटी चक्क निधी उपलब्ध करून दिला आहे.भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू झाली असताना माणगांव नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष व कार्यकर्ते याच्या वागणुकीमुले होत आहे अंमलबजावणीचा भंग.

नागरिकांना आचार संहिता भंगाच्या तक्रारी या कक्षाद्वारे तातडीने तक्रारीची दखल घेण्यात येईल का.हा कक्ष 24 तास सुरू राहणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आता या घटनेची दखल शाशन कितपर्यंत घेणार यावर कोणती कारवाई होणार ते पाहूया.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट