जन सामान्यांची कणव असलेले युवा नेतृत्व विनोद भाऊ पाशिलकर…

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड

माणगांव :-राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज ही नेहमीच जनसामान्य माय बाप जनतेला असते. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते झुंझार नेतृव भाई पाशिलकर यांनी आजपर्यंत अनेक कार्यकर्त्यांना घडविले. त्यांचा वारसा सुपुत्र विनोद भाऊ पाशिलकर यांनी जपला आहे. प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीतच त्यांनी जनमाणसांत वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोरोना, चक्री वादळ, महापूर यांसारख्या संकटात ते जनतेच्या मदतीला धावून आले. गाव पातळीवर काम करत असताना विकासाच्या नवनव्या संकल्पना ते मांडत आहेत. सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करण्याचे काम ते करतात. अश्याच तरुण, तडफदार, युवा, महत्वाकांक्षी गरुडझेप घेणाऱ्या नेतृत्वाचा आज वाढदिवस…

केवळ गाव पातळीवर नव्हे तर तालुका, जिल्हा तसेच राज्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ नेते भाई साहेब पाशिलकर यांच्या उक्ती आणि कृतीचा वारसा विनोद भाऊ यांनी जपला आहे. वयाच्या १७ ते १८ वर्ष असताना क्रीडा, कला, सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रचंड आवड, त्यात क्रिकेट खेळ म्हणजे अगदी त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना हळुहळु राजकारण, समाजकारणात सक्रिय झाले. घरातूनच राजकीय क्षेत्राचे बाळकडू असल्यामुळे समाजकार्यांची प्रचंड आवड.

साधारणतः सन २०१८ ते २०१९ साली रायगड चे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. पक्ष बांधणीसाठी त्यांनी तालुका भर दौरे केले, कामाची प्रचंड आवड निःस्वार्थवृत्ती, दूरदृष्टीकोन,जबाबदार प्रेरकवृत्ती, उदारता या उपजत गुणांमुळेच कार्यकर्त्यांत त्यांनी नवचैतन्य निर्माण केले. याचा फायदा पक्ष वाढीस उत्तम गतीने झाला. मग ती मागच्या सरकार मधील महाविकास आघाडी सरकार असो अथवा सध्याच युती सरकार तालुक्यामध्ये या नेतृवाची नेहमीच वेळली अशी छाप सामान्य जनतेने जवळून पाहिली आहे. तस तर त्यांच बोलणं कमी पण विकास कामांचा सपाटा यावर अधिक भर, कोणत्याही राजकीय विरोधकांवर एखादी टीकाटिप्पणी सुद्धा त्यांच्या आज वरच्या राजकारणात दिसून आली नाही हिच खरी ओळख असेलेला हा नेता. तस पहायला गेलं तर श्रीवर्धन मतदार संघात विद्यमान खासदार सुनिल तटकरे व कुटुंबियांचा नेहमीच भाई साहेब पाशिलकर व पाशिलकर घराण्याशी निकटचा कौटुंबिक जिव्हाळा आजवर राहिला आहे.

सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदार संघातून कु.आदिती तटकरे यांनी अर्ज भरला होता. कौटुंबिकता, आणि बंधू प्रेम हा पाशिलकर घराण्याचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी असल्याकारणे, सख्या बंधु प्रमाणे विनोद पाशिलकर यांनी ग्रामपंचायत, मतदार संघातील प्रत्येक वार्डात कार्यकर्त्याच्या भेटी घेऊन जातीने लक्ष केंद्रीत केले याचा फायदा कु.अदितीताई तटकरे यांना मोठया मताधिक्यांनी निवडून देण्यात झाला. तिच पुनरावृत्ती या निवडणुकीत अधिक पटीने झाली.

कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम विनोद भाऊ पाशिलकर यांनी केले आहे. त्यामुळेच तालुक्यासह जिल्ह्याच्या तरुणाईचे ते आशास्थान बनले आहेत. यातुनच आश्वासक आणि प्रेरक नेतृत्वाची साक्ष जनतेला पटली आहे. विनोद भाऊ पाशिलकर यांच्याकडून जनतेला फार मोठ्या अपेक्षा आहेत. जनतेच्या कसोटीवरही ते यशस्वी ठरोत आणि या राज्याचे नेतृत्व करोत, याच त्याना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा. श्री रुपेश रटाटे

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट