विंचू दंशाने बोरगाव येथील एका 58 वर्षीय इसमाचा मृत्यू…
प्रतिनिधी-राकेश देशमुख
महाड: दिनांक 29 मार्च 2023 रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास बोरगाव येथील शेतावर विंचू दंशाने एका 58 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
सुरेश गोपाळ पवार असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते बोरगाव-मोहोत, तालुका महाड येथील रहिवासी होते. दिनांक 29 मार्चला सायंकाळी बोरगाव येथील घराशेजारी शेतावर काम करीत असताना त्यांना विंचू दंश झाला.

विंचू दंश झाल्याचे समजतात सुरेश पवार यांना बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचाराकरिता पाठविण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचाराकरिता महाड ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले परंतु सुरेश पवार यांना रस्त्यामध्येच उलट्या होण्यास सुरुवात झाली व त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
सदरचा मृत्यू देह बिरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे या मृत्यूची अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
या संपूर्ण मृत्यूचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सिद्धेश मोरे हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com