ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे डोंगराला लागलेली आग विझवण्यात खावली ग्रामस्थांना यश

0
Screenshot 2025-03-28 230647
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

वाई :

मोठा अनर्थ टळला
मंगळवार दिनांक 18/03/2025 रोजी वाई पोलिस स्टेशन हद्दीतील खावली ता. वाई जिल्हा. सातारा, गावातील खवली व रेनावळे हद्दीतील डोंगराला अचानक संध्याकाळी 7:30 वाजता आग लागलेली आहे,हे लक्षात येतातच सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गावचे सरपंच श्री अमर सपकाळ यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून तात्काळ ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील तरुण मदतीसाठी धावले.सर्व गावकऱ्यांनी मिळून आग विझवली व *डोंगराला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात यश आले.

 ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट