ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे डोंगराला लागलेली आग विझवण्यात पाचवड ग्रामस्थांना यश

सह संपादक – रणजित मस्के
खटाव :
गुरुवार दिनांक 20/03/2025 रोजी वडूज पोलिस स्टेशन हद्दीतील पाचवड ता. खटाव जिल्हा. सातारा, गावातील डोंगराला दुपारी 12:00 वाजता अचानक आग लागलेली आहे,हे लक्षात येतातच सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गावचे पोलीस पाटील श्री. दिलीप घाडगे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून तात्काळ ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील तरुण मदतीसाठी धावले. अग्निशामक गाडी व वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.सर्व गावकऱ्यांनी मिळून आग विझवली.
डोंगराला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात यश आले. व ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.