गांव खेड्यातून तब्बल ११ दुचाकी चोरणाऱ्या टोळीस महाड एमआयडीसी पोलीसांनी ठोकल्या बेड्या..
उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:– महाड तालुक्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ…
दुचाकी मालकांच्या मनात भीतीचे वातावरण..
गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी रुपेश शंकर पवार राहणार टेमघर या मालकाची दुचाकी रात्री अंगणात पार्किंग केली असताना रात्री ११ वाजता चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर महाड एमआयडीसी पोलीसांनी या अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
महाड एमआयडीसी पोलीसांनी सीसीटीव्हीच्या आधारे महाड शहराच्या नदीकिनारी दुचाकी विकण्यासाठी गिरहाईकाची वाट बघत असताना आरोपी सागर वीरेंद्र सोळंकी राहणार आदर्श नगर बिरवाडी याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
तसेे त्याचे इतर साथीदार युवराज विठोबा जगताप राहणार साकडी याला बिरवाडीमधून ताब्यात घेतले व सुहास रमेश नाईलकर राहणार रुपवली याला महाड शहरातून अटक करण्यात आले.
त्यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला की या चोरट्यांनी तब्बल अकरा दुचाकी चोरल्या आहेत . सदरच्या मोटारसायकली भिवंडी, प्रतापगड, मंडणगड, रुपवली, साकडी, कुसगाव, चिंभावे आणि महाड शहर येथून चोरल्या आहेत.
त्यामुळे महाड तालुक्यात या दुचाकी चोरीचा प्रकार पाहून महाडकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकारामुळे पोलीसांची मात्र चांगलीच धावपळ झाल्याची देखील पाहायला मिळत आहे .
या आधी महाड तालुक्यात अनेक प्रकारच्या चोऱ्या करणारे चोर पकडले होते मात्र या चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे चोरांवर पोलीसांची वचक राहिले की नाही असा प्रश्न उभा राहत आहे. परंतू महाड एमआयडीसी पोलीसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीस अटक केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शंकर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com