विक्रमगड पोलीसानी कत्तलीसाठी घेवून जात असलेल्या १५ गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेवून २ आरोपींना ठोकल्या बेड्या..

प्रतिनिधी-मंगेश उईके
विक्रमगड :– श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेसाठी पोलीस ठाणे हद्दित प्रभावी गस्त घालणे तसेच नाकाबंदी लावणेबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना व आदेश दिलेले आहेत.


त्याअनुषंगाने दिनांक १०/०८/२०२४ रोजी विक्रमगड पोलीस ठाणे हद्दित अधिकारी व अंमलदार हे सतर्कतेने रात्रीगस्त करीत असताना पहाटे ०४.३० वाजेच्या सुमारास मौजे चिंचघर गावचे हद्दीत पाचमाड कुंड़ों रोडवर पहाटे ०४.३० वाजताचे सुमारास पोलीस अधिकारी व अंमलदार हे शासकीय वाहनाने गस्त करीत असतांना त्यांना एक संशयित पिक अप जिप समोरुन येतांना दिसली.
नमुद वाहनातुन काहीतरी अवैधरित्या वाहतुक होत असल्याचा संशय बळावल्यामुळे सदर पिक अप जिप क्रमांक MH ४८ BM ९६५३ थांबण्याचा इशारा केला असता त्यावरील चालक याने कायदेशिर कारवाईसाठी विरोध व्हावा या उद्देशाने त्याचे ताब्यातील पिक जिप क्रमांक MH ४८ BM ९६५३ ही पोलीसांचे शासकीय वाहनाचे दिशेने भरधाव वेगात चालवुन पळून गेले.
नमुद पिक अप जिपचा पाठलाग करुन पिक जिपला अडविले असता त्यातील चालक नामे १) सिराज दादामिया शेख, वय ४० वर्षे, रा. वेलफेअर सोसायटी, रूम नं.७, सुभाननगर महापोली, ता. भिवंडी, जि.ठाणे हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. व त्यातील क्लिनर २) नयन दिनेश पाटील, वय २३ वर्षे, रा.देपोली, पो. आनगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे हा पळून जाण्याचे तयारीत असतांना त्यांना पोलीसांनी मोठ्या शिताफीने पकडले. सदर आरोपीस ताब्यात घेवुन पिक अप जिपची तपासणी केली असता त्यामध्ये गायी व लहान मोठे वासरे अशी एकुण १५ जनावरे दाटीवाटीने कोंबुन त्यांना कोणत्याही प्रकारे चारा पाण्याची व्यवस्था न केलेल्या परिस्थितीत आढळून आलेले आहे.
त्यापैकी दोन गायी मृत अवस्थेत आढळून आलेल्या आहेत. सदर गायींना आरोपींनी कोठुन तरी चोरी करुन कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झालेले आहे. त्यानंतर आरोपी क्रमांक १ याचा पोलीसांनी शोध घेतला असता तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास पाली फाटा, ता. वाडा येथून ताब्यात घेतले.
नमुद कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेल्या १३ जिवंत गार्गीची पशु वैद्यकीय अधिकारी यांचेकडुन वैद्यकीय तपासणी करुन सदर गायींना सुरक्षितरित्या संगोपनासाठी सकवार, ता. वसई येथील गोशाळेत नेवुन ठेवण्यात आलेले आहे. नमूद आरोपींविरुध्द विक्रमगड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक १८३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, १३२, १२५, ३२५, ३ (५) सह प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० चेकलम ११ (१), (घ), (ङ), (ज) सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चेकलम ५, ५ (ब), ६, ९, ९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोउनि/दिपक दुस, नेमणूक विक्रमगड पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी हि श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / रविंद्र पारखे, श्रेपोउनि/अर्जुन काळे, पो.हवा/१२९ मोहन शेळके, पो.हवा./१२३ काशिनाथ कव्हा, पो.शि./१०० जितेंद्र चौधरी यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com