सातारा रात्रगस्त पोलिसांची सतर्क कारवाई.. मंदिरातील दानपेटया फोडणा-या अट्टल टोळीस अटक करुन मोबाईलसह एकुण १,२५,१९८/- रु. चा मुद्देमाल हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा : दानपेट्यातील चोरलेली रक्कम ५९,१४८/- रु. व गुन्ह्यातील वापरलेले वाहन, कटावणी व आत्तापर्यंत १५ ठिकाणी मंदिरातील दानपेटया फोडल्याची दिली कबुली. एका आरोपीसह दोन अल्पवयीन ताब्यात. उंब्रज पोलीस टिमची कारवाई.

सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. समीर शेख सो यांनी सतर्कपणे रात्रगस्त करुन तसेच अचानक नाकाबंदी करुन चोरीस गेलेली वाहने व आरोपी शोधुन त्यांचेवर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीत शोधमोहीम राबविणेत येत आहे. उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोहीमेमध्ये सक्रिय सहभागी झाले होते.

दिनांक २३.०१.२०२३ रोजी रात्रगस्त करीता नेमलेल्या पोलीस अंमलदार यांना सतर्कपणे रात्रगस्त करणेबाबत सपोनि अजय गोरड यांनी सुचना केल्या होत्या. सातारा येथे फायरींग करुन दोघेजण एका विनानंबरच्या मोटार सायकलवरुन पळुन गेलेने कंट्रोल माहीतीनुसार दिनांक २४.०१.२०२३ रोजी पहाटे नाकाबंदी करणेबाबत आदेशीत केलेले असलेने व रात्रगस्त नाकाबंदी करीत असताना उंब्रज मोबाईलवरील सहा. पोलीस उपनिरीक्षक संजय देवकुळे, चालक पो. हेड कॉ. सचिन देशमुख, पो. कॉ. दत्तात्रय लवटे यांना प्राप्त माहीतीनुसार एका मोटार सायकलवरुन संशयीत ०३ इसम मंदिरात चोरी करुन हायवेवरुन येत असलेची माहीती प्राप्त झालेने उंब्रज प्रवेशमार्गावर गस्त करीत असताना त्यांना एका मोटार सायकलवरुन तिघेजण स्वतःचे अस्तीत्व लपवुन, चेहेरा झाकलेले महामार्गावरुन खाली येत सेवारस्त्यावरुन कराड बाजुकडे जाताना दिसले त्यांना हात करुन थांबणेचा इशारा देवुनही ते तसेच पुढे भरधाव वेगात निघालेने त्यांचा पाठलाग शासकीय वाहनाने करुन त्यांनी मार्ग बदलुन अंधारवाडी रोडने जात असताना महात्मा गांधी महाविद्यालयानजीक त्यांना थांबवुन विचारपुस करता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत ईकडुन येण्याचे सबळ कारण व माहीती देता आली नसलेने त्यांना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणुन त्यांचेविरुध्द चालक पो. हेड कॉ. सचिन देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे फिर्याद दिली.

त्यानंतर ताब्यात घेतले आरोपीतांकडे सखोल चौकशी करता त्यांनी मोजे पाडळी ता. जि. सातारा येथील श्री गणेशाचे मंदिरात प्रवेश करुन दानपेटी फोडलेली असलेचे कबुल केलेने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात हिरो कंपनीची एच. एफ. डिलक्स मोटार सायकल नं. एम. एच. ५०/ एस. ७२०५ तसेच तिला अडकविलेली लोखंडी कटावणी, दोन मोबाईल संच व ०१, ०२, ०५, १० रु. दराची चिल्लरनाणी, १०, २०, ५०, १०० व ५०० रु. दराच्या चलनी नोटा मिळुन एकुण रोकड रु. ५९१४८/- सह मो. सा. व मोबाईल संच, कटावणी यांसह एकुण मिळून रु. १,२५,१९८/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असुन सदरहू चोरटयांनी उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीत मसुर फाटया वरील श्री मायाक्का मंदिर, भोसलेवाडी गावचे हद्दीतील श्री गोपालनाथ मंदिर, तळबीड पोलीस स्टेशन, बोरगांव पोलीस स्टेशन, पाटण पोलीस स्टेशन, कराड तालुका पोलीस स्टेशन, कडेगांव पोलीस स्टेशन जि. सांगली, शिराळा, ईस्लामपुर पोलीस स्टेशन जि. सांगली हद्दीत मंदिरांमध्ये दानपेटया फोडुन चो-या केलेची कबुली दिलेली असून आणखी काही मंदिरांमध्येही दानपेटया फोडुन चोरी केल्याचा संशय असुन त्यांचेकडे अधिक तपास चालू आहे.

सदरची कारवाई मा. श्री. समीर शेख सो, पोलीस अधीक्षक सो सातारा, मा. श्री. बापू बांगर सो अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, मा. डॉ. रणजीत पाटील साो, उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग कराड यांचे मार्गदर्शनाखाली उंब्रज पो. स्टे. चे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक अजय गोरड, सहा. पो. उपनिरीक्षक संजय देवकुळे, सचिन देशमुख, पो. कॉ. दत्तात्रय लवटे यांनी केलेली आहे. पुढील तपास सहा. पो. फौजदार अभय तावरे व पो. ना. प्रशांत सोरटे हे करीत आहेत.

आरोपींची नांवे :

1) साहिल विजय देशमुख, वय 21, मुळगाव कादेपूर ता. कडेगाव जि. सांगली नुकतेच रु. गरवाडे ता. पाटण. आणि दोन अल्पवयीन.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट